शिवसेना पक्षातील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन गटांतील वादासंदर्भात सर्वोच न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाचे हे ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने या संदर्भातील उद्धव ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. शिंदे गटाने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर यापुढे शिवसेना पक्ष कोणाचा आणि या पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबतची लढाई उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगातच लढावी लागणार. दरम्यान, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुरू असलेली न्यायालयीन लढाई खूप दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबत सवित्तर वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “…हे तर त्यांना मिळालले उत्तर!” शिंदे-ठाकरे गटातील वादावरील न्यायालयाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचे विधान

हे खूप दुर्दैवी आहे. आता वैचारिक लढाई संपलेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सगळेच ओरबाडून घेतले जात आहे. बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग म्हणजे त्यांची मुलं आणि नातवंडे आहेत. बाळासाहेबांच्या मुलावरच हल्ला केला जात आहे. हे संयुक्तिक नाही. हे माझ्या मनाला न पटण्यासारखं आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >> शिंदे गट-उद्धव ठाकरेंच्या वादावरील निकालावर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रया, जयंत पाटील म्हणाले…

तुमच्यात मतभेद असतील तर वेगळं घर करायला हवं. तुम्हाला शुभेच्छा असतील. पण ओरबाडून घेतले जात असून ठाकरे कुटुंबावर नको ते आरोप केले जात आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरत आहेत. मात्र त्यांना बाळासाहेबांची मुलं आणि नातवंडं चालत नाहीत. हे खूप दुर्दैवी असून आपल्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा >> शिंदे गट-उद्धव ठाकरे वादावरील निकालानंतर अमृता फडणवीसांचे महत्त्वाचे विधान, म्हणाल्या…

शरद पवार यांच्याविरोधात जेव्हा काँग्रेसने कारवाई केली होती, तेव्हा त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला होता. विचार एक असेल तर आपले वेगळे घर करावे. वैचारिक लढाई असेल, तर काहीही हरकत नाही. या भांडणामुळे, कोर्टाच्या लढाईमुळे बाळासाहेब ठाकरेंना किती वेदना होत असतील, असेदेखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule comment supreme court verdict on eknath shinde uddhav thackeray clash on shivsena remember balasaheb thackeray prd
First published on: 27-09-2022 at 19:34 IST