Supriya Sule Criticise Pankaja Munde : गुन्हेगारीच्या घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडत असून अशा घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या घटनांवर राजकारण होता कामा नये. मात्र परळी, बीडलाच बदनाम केलं जातंय, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी काल (११ जानेवारी) दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या बुलढाण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “परभणी आणि बीड या दोन्ही घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संसदेत पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने परभणी आणि बीडप्रकरणी आवाज उठवला. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, मुंदडा, अजित पवारांचे आमदार सोळंके यांनी विधानभवनात हा मुद्दा मांडला. ही अत्यंत क्रूर आणि गलिच्छ घटना झाली आहे. यात राजकारण आणू नये. माणुसकीच्या नात्याने परभणीला न्याय देण्याची मागणी करतेय. या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात ३३ दिवसांनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. सातत्याने प्रश्न मांडले जात आहेत, त्याचे उत्तर येत नाही. अजूनही एक खुनी फरार आहे. वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आली तरीही कारवाई झाली नाही. त्याच्यावर मकोकाह लावण्यात आला नाही. तो अटकेत आहे, पण त्याची अटक कशी झाली? तो शरण आला. ही चेष्टा लावली आहे का?”

वाल्मिक कराडच्या कृतीमुळे बीड बदनाम

“आम्ही माणुसकीच्या नात्याने उभे आहोत. जोपर्यंत या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही, आम्ही माणुसकीच्या नात्याने स्वस्थ बसणार आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या विधानाविषयी विचारलं. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कोणताही जिल्हा व्यक्तीमुळे नाहीतर कृतीमुळे बदनाम होतो. वाल्मिक कराडच्या कृती आणि कामाच्या पद्धतीमुळे जिल्हा बदनाम होत आहे.”

हेही वाचा >> Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय

तसंच, वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबत जी कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी ही हत्या केली असेल त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.

k