scorecardresearch

Premium

अलिबाग: अजित पवारांसारखा भाऊ मिळणे हे सुप्रियाताईंचे भाग्य – सुनील तटकरे

सुप्रियाताईंचे संसदेतील ते वक्तव्य अजित पवार यांच्याशी अभिप्रेत नसावे असं खासदार सुनील तटकरे यांच्या स्पष्ट केलं आहे.

sunil tatkare remark on supriya sule ajit pawar brother sister relationship
सुनील तटकरे संग्रहित छायाचित्र

‘सुप्रिया सुळे यांचे ते वक्तव्य अजित पवारांशी अभिप्रेत नसावे’

अजित पवार यांच्यासारखा भाऊ मिळाला त्यामुळे सुप्रियाताई भाग्यवान आहेत असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केलंय. अजित दादा यांच्याशी सुप्रियाताईंचे भावनिक नातं आहे त्यामुळे संसदेतील सुप्रिया पवार यांचे ते वक्तव्य अजित पवार यांच्याशी संबंधित नसावं असं मत तटकरे यांनी व्यक्त केलं आहे. महिलांच्या हिताचा विचार प्रत्येक भावाने करावा पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात. ज्यांना बहिणींचं कल्याण व्हावं असं वाटतं, प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केलं होतं. या विषयावर ते बोलत होते.

हेही वाचा >>> “मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली की…”, आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य

Ajit Pawar vs Rohit Pawar
“आत्मक्लेश करण्यासाठी आता यशवंतराव चव्हाणांच्या छायाचित्रासमोर बसा!”, रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
rohit pawar on devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू”, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
ajit pawar jayant patil
“अर्थखातं कधीपर्यंत टिकेल सांगता येत नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…

अजित पवार हे बारामती मधून सातत्याने चढत्या मताधिक्याने निवडून आले आहेत. एवढा ताकदवर नेता भाऊ म्हणून मिळणं खरच भाग्याची गोष्ट आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सुप्रियाताईंचे संसदेतील ते वक्तव्य अजित पवार यांच्याशी अभिप्रेत नसावे असं खासदार सुनील तटकरे यांच्या स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा >>> कमी पटसंख्येच्या शाळांवर घाला; राज्यभरात समूह शाळांची निर्मिती

जुन्या संसदेच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी सिंचन घोटाळा आणि शिखर बँकेच्या चौकशीची मागणी केली पण, अशी मागणी करणे योग्य नव्हते. त्यादिवशी जुन्या संसद भवनांमधील आठवणींना उजाळा देणे अपेक्षित होते. सिंचन घोटाळा आणि शिखर बँक प्रकरणात वेगवेगळ्या एजन्सीज कडून तपास करण्यात आला आहे. या तपासात काहीही निष्पन्न झालेले नाही. न्यायालयातही या संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यातही काही झालेले नाही. त्यामुळे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळी राजकीय भुमिका घेतल्याने व्यथित होऊन अशी मागणी करणे योग्य नसल्याचेही तटकरे यांनी यावेळी म्हटले.

आ. रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका

सुनिल तटकरे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. रोहित पवार अकाली प्रौढत्व आल्यासारखे वागतात, जणू जगातील देशातले राजकारण एकटय़ालाच कळत असा त्यांचा  अविर्भाव असतो , असे सुनील तटकरे म्हणाले.जे भाजप सोबत गेलेत त्यांना कमळाच्या चिन्हावर लढावं लागेल असं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं होतं. त्यावर तटकरे बोलत होते.

अजित पवार हे दादा आहेत त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पहिल्यांदाच विधान सभेत निवडुन आलात त्यात अजित पवारांचे योगदान मोठ आहे याची जाणीव करून दिली. चांगल्या प्रकारे काम करा असा सल्ला सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना दिला आहे. स्वत:ला प्रेससमोर येण्यासाठी रोहित पवार स्टेटमेंट करतात असा केला आरोपही तटकरे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदार अपात्रतेसंदर्भात आमच्याकडूनही विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल झाली असल्याचे त्यांनी सांगीतले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule lucky to have brother like ajit pawar says sunil tatkare zws

First published on: 22-09-2023 at 23:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×