राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात समाजमाध्यमावर हिणकस लिखाण करणारी अभिनेत्री केतकी चितळेचा जामीन अर्ज न्यायालयाने २६ मे रोजी फेटाळला. केतकी चितळेला १४ मे रोजी अटक करण्यात आल्यानंतर तिने न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर जामीन अर्ज ठाणे न्यायालयाकडे केला होता तो फेटाळण्यात आलाय. मागील १५ दिवसांहून अधिक काळापासून केतकी अटकेत आहे. असं असतानाच आता दुसरीकडे केतकीने शरद पवारांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. केतकीबद्दल आक्षेपार्ह भाषेमध्ये वक्तव्य केली जात असून अशी वक्तव्य करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. असं असतानाच यासंदर्भात आता शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उस्मानाबादमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

नक्की वाचा >> शरद पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच केतकी चितळेने केलं भाष्य; हसत म्हणाली, “त्या दिवशी…”

या प्रकरणात आतापर्यंत काय घडलंय…
अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केला होता. याप्रकारानंतर तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला अटक केली होती. ठाणे न्यायालयाने सुरूवातीला तिला पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर केतकी चितळे हिने वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…

नक्की वाचा >> घरी जा, स्वयंपाक करा प्रकरण: चंद्रकांत पाटलांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या, “एक तर पहिल्यापासूनच मी…”

केतकीच्या या अर्जावर मागील सोमवारी म्हणजेच २३ मे रोजी ठाणे न्यायालयात सरकारी वकिलांनी आणि केतकीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. याप्रकरणात दबावाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून केतकीला जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केतकीच्या वकिलांनी केला. तर, सरकारी वकिलांनीही त्यांचे म्हणणे मांडले. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी गुरुवारी निर्णय देत तिचा जामीनअर्ज फेटाळला आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणी वाढल्या आहेत. या निर्णयाविरोधात सत्र न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती केतकीच्या वकिलांनी दिली.

नक्की पाहा हे फोटो >> केतकी ब्राह्मण असल्याने तिला समर्थन देताय का?; तृप्ती देसाई म्हणाल्या, “पाठिंबा दिल्यास सगळे जातीवर…”

अन्य एका प्रकरणातही पोलीस कोठडी
बौद्ध धर्माविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी रबाळे पोलिसांनी केतकी चितळे हिला अटक केली आहे. शुक्रवारी केतकीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे केतकीच्या अडचणीत आता वाढ झालेली आहे. केतकीविरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवार प्रकरणात अटकेत असणाऱ्या केतकीचा ताबा रबा‌ळे पोलिसांनी तिच्या अटकेनंतर काही दिवसांनी घेतला.

नक्की वाचा >> केतकी चितळेच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवरुन सुजात आंबेडकरांचा संताप; म्हणाले, “जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार…”

२० मे रोजी या प्रकरणासंदर्भात तिला न्यायालयात हजर केले. हा गुन्हा दोन वर्षांपूर्वी झाला होता. तसेच केतकीचा जबाब रबाळे पोलिसांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे तिला पोलीस कोठडीची आवश्यता नसल्याचे केतकीच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले. तर, याप्रकरणाचा तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी याप्रकरणी तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामध्ये नंतरही वाढ करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण : तृप्ती देसाईंचा केतकीला पाठिंबा; म्हणाल्या, “तिने जी पोस्ट टाकलीय त्यामध्ये पवार…”

केतकीच्या कोठडीबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना रविवारी पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “ज्यांचं तुम्ही नाव घेतलं त्यांना तुरुंगामध्ये आम्ही नाही टाकलं. तो निर्णय न्यायालयाचा आहे. आमचा नाहीय. आम्हाला तो अधिकारच नाहीय,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुढे पत्रकारांनी, तुमच्याच कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केलाय, असं म्हणत सुप्रिया यांना प्रतिप्रश्न केला. “गुन्हा दाखल केल्यावर कारवाई कोण करतं दादा? न्यायालय घेतं. तुम्ही थोडासा फॉलोअप करा निर्णय आमचा कुठलाच नाहीय,” असं सुप्रिया यांनी पत्रकाराला उत्तर देताना सांगितलं.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारताच अजित पवारांचा संताप; म्हणाले, “कुणीतरी विकृत व्यक्ती इतक्या घाणेरड्या…”

केतकीविरोधात होणाऱ्या वक्तव्यांवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
केतकी चितळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ट्रोल केलं जात आहे तिच्याविरोधातही अशापद्धतीच्या वादग्रस्त पोस्ट केल्या जातायत यासंदर्भातही सुप्रिया यांनी भाष्य केलं. “जर आमच्या बाजूने जर कोणी अशी चुकीची पोस्ट केली असेल तर ती पोस्ट तुम्ही जरुर मला द्या. पोलीस स्थानकामध्ये जर तक्रार झाली नसेल तर ती घ्याची जबाबदारी माझी,” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.