Supriya Sule on Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणारे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार काल (१४ ऑगस्ट) सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यावर जमा झाले. त्यामुळे महिला वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. रवी राणा यांच्या विधानाचा संदर्भ घेत त्यांनी ही टीका केली. "निवडणुका आल्या आहेत, तुम्ही काय अपेक्षा करता? मी माझ्या बहिणींना विनंती करते की तुम्ही पटकन ते पैसे काढून घ्या. भाजपाचे दोन दोन लोक म्हणत आहेत की पैसे काढून घेऊ. त्यामुळे ज्यांच्या अकाऊंटला पैसे आले आहेत त्या भगिंनींना माझी विनंती आहे की तुम्ही ते पैसे काढून घ्या. काही सांगता येत नाही या सरकारचं", अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली. हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : रवी राणांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या…” रवी राणा काय म्हणाले होते? आमदार रवी राणा यांनी सोमवारी लाडकी बहीण योजनेबाबत एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. “सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले होते. आमदार रवी राणा यांनी सोमवारी लाडकी बहीण योजनेबाबत एक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. “सरकारने महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिवाळीनंतर ही रक्कम वाढवून तीन हजार रुपये केली पाहिजे. आज सरकारने तुम्हाला १५०० रुपये दिले आहेत. उद्या तुमचा भाऊ म्हणून मी ही रक्कम तीन हजार करण्याची विनंती सरकारकडे केली, तर तुम्हाला तीन हजार मिळू शकतात. पण ते तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही मला तुमचा भाऊ म्हणून मतरुपी आशीर्वाद द्याल. पण जर तुम्ही या निवडणुकीत मला आशीर्वाद दिला नाही, तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या खात्यातून लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये काढून घेईन”, असं आमदार रवी राणा म्हणाले होते.