scorecardresearch

Premium

बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण काय असेल? यावरून चर्चा सुरू आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामतीतून सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयाचं पूर्ण ताकदीने स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

rohit pawar on devendra fadnavis
“…तेव्हा अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू”, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…
rohit pawar on supriya sule and sunetra pawar
बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढणार? रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Chandrashekhar-Bawankule-Ajit-Pawar
“अर्थखातं कधीपर्यंत टिकेल, माहीत नाही”, अजित पवारांच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भविष्यात…”
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…

हेही वाचा- एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझं म्हणणं आहे की , आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्ली काय दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पाहतोय. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटतं की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे.”

हेही वाचा- “…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान

“भारतीय जनता पार्टी तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली. यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचं मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे. टिकली पाहिजे. आपण अशा सर्व निर्णयांचं पूर्ण ताकदीने स्वागत केलंच पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलंच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule on speculations about sunetra pawar will contest baramati loksabha election ajit pawar rmm

First published on: 25-09-2023 at 14:29 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×