भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, कंबोज यांच्या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मी बोलण्यापेक्षा ज्यांनी ट्वीट केले, त्यांनाच जाऊन विचारावं लागेल, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – ‘५० खोके, गद्दार हाय हाय’, मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले “हे बेईमानांचं सरकार…”

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

कंबोज यांच्या ट्वीटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सिंचन घोटाळ्याचा विषय आता संपला आहे. मात्र, हा विषय पुन्हा का काढला जातो आहे. याबाबत मला बोलता येणार नाही. ज्यांनी ट्वीट केले, त्यांनाच जाऊन विचारावं लागेल, असं त्या म्हणाल्या.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”

मोहित कंबोज यांचा दावा काय?

मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्वीट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं दावा त्यांनी केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.”