अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांना रुपयाच्या अवमुल्यनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी उत्तर देताना त्यांनी ”रूपया घसरत नसून, डॉलर सातत्याने मजबूत होत आहे”, असे म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी निर्मला सीतारामन यांना दिवंगत सुषमा स्वराज यांच्या संसदेतील भाषणाची आठवणही करून दिली.

हेही वाचा – “काश्मीर खोऱ्यात हिंदू सुरक्षित नाहीत, आमचे मुस्लीम शेजारीही…,” दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडिताची हत्या केल्यानंतर बहिणीचा आक्रोश

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“मागील काही वर्षातली माझी संसदेतली भाषणं काढून बघा, मी सातत्याने महागाई आणि बेरोजगारीवर आवाज उठवते आहे. मात्र, आज मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य टीव्हीवर बघितलं. त्या असं म्हणाल्या, की “रुपया घसरत नाही, तर डॉलर मजूबत होतो,” मला त्यांना आवर्जून एक आठवण सांगायची आहे. दिवंगत सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की ‘पैसा केवळ कागदाचा तुकडा नसतो, त्याबरोबर देशाची प्रतिष्ठादेखील जुळलेली असते. जेव्हा रुपयांचे अवमुल्यन होते, तेव्हा देशाची प्रतिष्ठाही खाली जात असते”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

हेही वाचा – “रुपया घसरत नाहीये, तर डॉलर मजूबत होतोय,” निर्मला सीतारामन यांचे विधान

आम्ही देशाची अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी या मुद्यांचा गांभीर्याने विचार करतो. गेली अडीच वर्ष मी संसदेत याविषयांवर बोलत आहे. आज तुम्हाला त्याचे परिणाम दिसत असतील, असेही त्या म्हणाल्या.