scorecardresearch

Premium

“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप”, तटकरेंनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे प्रत्युत्तर देत म्हणाल्या…

गेल्या दोन दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

sunil tatkare supriya sule
सुनील तटकरेंनी केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ( संग्रहित छायाचित्र )

खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे आमने-सामने आले आहेत. “स्वत:चं राजकीय अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यांवर आरोप केले जातात,” अशी टीका सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंवर केली होती. यावर सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “माझ्यावर संस्कार असल्याने मी मर्यादा ओलांडणार नाही,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

“संसदेत महिला आरक्षण कायदा पास करण्यासाठी मतदान झालं. तेव्हा सुनील तटकरे हजर नव्हते. भाजपाबरोबर तडजोड केल्याने नैतिकतेच्या आधारावर तटकरेंच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
13 Notice to central government on doctor plea
१३ डॉक्टरांच्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस
Supriya sule
“…तेव्हा काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाहीत?”, अजित पवार गटाची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका
rape on a woman
अकोला : नातेवाईकाकडे महिला पोळ्या करायला गेली आणि नराधमाने केला बळजबरी अत्याचार; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

हेही वाचा : “२०० आमदार असूनही राज्य सरकार अस्थिर”, सुप्रिया सुळेंच्या विधानावर अजित पवार म्हणाले…

सुप्रिया सुळेंच्या विधानावर बोलताना सुनील तटकरेंनी शुक्रवारी ( २४ नोव्हेंबर ) म्हटलं, “केवळ टीका करण्यासाठी जाणीवपूर्वक काही गोष्टी बोलल्या जातात. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या वेळी मी मतदान केलं नाही.’ खरे आहे. मी पंतप्रधान मोदींचं भाषण पूर्णपणे ऐकलं. मी वारंवार सांगितलंय की, ‘गणेशोत्सवाचा पहिला दिवस असल्याने घरी होतो.’ लोकसभेचे ५४२ सदस्य आहेत. मतदानात सहभागी झालेल्या सदस्यांची संख्या ४८० होती. त्यामुळे बाकीचे सगळे महिला विरोधी असल्याचं म्हणणं चुकीचं आहे.”

“स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यांवर आरोप केले जातात,” असं म्हणत सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंना लक्ष्य केलं होतं.

हेही वाचा : “मी लेचापेचा नाही, गेली ३२ वर्षे…”, अजित पवारांचं विधान, गृहमंत्र्यांच्या भेटीवरही सौडलं मौन

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्यावर वेणुताई-यशवंतराव चव्हाण, प्रतिभा आणि शरद पवार यांचे संस्कार आहेत. त्यामुळे ती मर्यादा कधीही ओलांडणार नाही. माझ्यावर आई-वडिलांनी सुसंस्कृत संस्कार केले आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule reply sunil tatkare over allegation women reservation bill and disqulification ssa

First published on: 25-11-2023 at 12:50 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×