शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंलडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करण्याची धमकी दिली. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. 'अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा', असं म्हणत त्यांनी मनसेला खुलं आव्हान दिलं. त्या उस्मानाबादमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, "मनसेच्या टीकेवर मी केवळ हसू शकते. 'अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा'. मी पाठीमागे अजिबात बोलत नाही. मी जे बोलते ते अत्यंत वस्तुस्थिती आणि सत्य ते बोलत आहे. आजारपणाची टिंगल करणं हे कुठल्याही सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील माणसाला रुचणारं नाही." "…तर मी मनसे नेत्यांच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार" "असं असलं तरी मी मुलुंडच्या सभेत मांडलेले मुद्दे गैरलागू आहेत असं कोणाला वाटत असेल, तर माझी चर्चा करण्याची तयारी आहे. त्यांनी खुल्या सभेत चर्चेला उभं राहावं आणि ते जे बोलले ते मांडणं किती महाराष्ट्राच्या हिताचं होतं हे सांगावं. माझी त्यावर बोलण्याची तयारी आहे. ते मला त्यांचा मुद्दा पटवून देऊ शकले तर मी त्यांच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार आहे," असं जाहीर आव्हान सुषमा अंधारेंनी मनसेला दिलं. व्हिडीओ पाहा : हेही वाचा : Photos : “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात, कारण…”, सुषमा अंधारेंचं वक्तव्य "राडा संस्कृतीचा एनसायक्लोपिडिया शिवसेनेने लिहिला" "असं असलं तरी ते मुद्द्यांची भाषा गुद्द्यांवर नेणार असतील तर शिवसेनेला गुद्द्यांची भाषा कुणीही शिकवण्याची गरज नाही. राडा संस्कृतीचा एनसायक्लोपिडिया शिवसेनेने लिहिला आहे," असं म्हणत अंधारेंनी सभेत राडा घालण्याची धमकी देणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यालाच सूचक इशारा दिला.