केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह त्यांची दोन मुलं निलेश राणे आणि नितेश राणे हे अनेकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राणे पिता-पुत्रांनी अनेकदा उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर टीकास्र सोडलं आहे.

कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्या दोन मुलांचा उल्लेख ‘बारकी बारकी पोरं’ असा केला आहे. त्यांनी केलेल्या खोचक टोमणेबाजीमुळे व्यासपीठावर एकच हशा पिकला होता. दरम्यान, त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची महिलांबद्दल असलेल्या मानसिकतेवरूनही टीका केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर देवेंद्र फडणवीस काहीच कारवाई करत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव
With the blessings of Udayanaraj i got more strength says shivendrasinh raje
सातारा: महाराजांच्या आर्शिवादाने मला दहा हत्तीचे बळ- शिवेंद्रसिंहराजे

हेही वाचा- “बायकांना बोलल्यावर देवेंद्रभाऊंना जणूकाही…” सुषमा अंधारेंचं फडणवीसांसह गुलाबराव पाटलांवर टीकास्र

राणे पिता-पुत्रांवर टीकास्र सोडताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “नारायण राणेंची जी दोन बारकी-बारकी पोरं आहेत, त्यांनी अनेकदा मातोश्रीवर टीका केली. मी बारक्या लेकरांबद्दल फार काही बोलत नसते. अजिबात बोलत नसते. पण ती जी दोन बारकी-बारकी लेकरं आहेत ना… त्यांनी उंची नसताना मातोश्रीवर गरळ ओकली आहे. मी त्यांच्या बौद्धिक उंचीबद्दल बोलतेय. पण देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत झाली नाही” अशी टीका अंधारे यांनी केली.