शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचे काही जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांचा अवमान केल्याचा दावा केला जात आहे. यावरून सुषमा अंधारेंनी माफी मागावी अशी मागणीही काही वारकऱ्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सुषमा अंधारेंनी स्वत: भाष्य केलं आहे. माझ्यावर आरोप करणारे वारकरी खरे वारकरी नाहीत. हे भारतीय जनता पार्टीने माझ्याविरोधात केलेलं जाणीवपूर्वक षडयंत्र आहे. सच्चा वारकरी अमंगल आणि अभद्र भाषा वापरणार नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे. त्या पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधत होता.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लीपवर स्पष्टीकरण देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “सोशल मीडियावर जे व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती भाजपाने माझ्याविरोधात जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र आहे. मुळात जो सच्चा वारकारी आहे, तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यापेक्षा चिकित्सक बुद्धीने प्रश्न विचारेल किंवा तर्काच्या आधारे चर्चा करण्याचं आव्हान देईल. पण तो अशी अमंगल आणि अभद्र भाषा वापरणार नाही. मुळात माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार किंवा वारकरी हे भागवत संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत. ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी आहेत. त्यामुळे भागवत संप्रदाय वेगळा आहे आणि मोहन भागवत संप्रदाय वेगळा आहे.”

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Prime Minister Narendra Modi criticism of the India front as rumors about CAA by the opposition
‘सीएए’बाबत विरोधकांकडून अफवा; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

हेही वाचा- “लाज नसलेल्या माणसाला…”, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हाडांचा टोला

“भारतीय जनता पार्टीच्या भक्तुल्यांनी आपापल्या सोशल मीडिया पेजवर जे काही शेअर केलं आहे. गेल्या पंधरा वर्षात त्यांना हे कधीही का सुचलं नाही? त्यांना आताच याची जाणीव का झाली? कारण आता त्यांना जे प्रश्न विचारले जात आहेत. त्याची उत्तर त्यांना सूचत नाहीत. अशा प्रश्नांना फाटा देण्यासाठी अशी षडयंत्र रचली जातात. मुळात चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून लक्ष हटवण्यासाठी टीम देवेंद्रकडून केलेला हा केवीलवाणा प्रयत्न सुरू आहे. माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार, प्रहसनकार हे पेड कीर्तनकार आहेत,” अशी टीका अंधारे यांनी केली.