“ज्याला नांदायचं नसतं त्याच्याकडं खूप कारणं असतात. शिंदे गटाला बाहेरच पडायचं होतं, म्हणून चाळीस गद्दार वेगवेगळी कारणं देत आहेत”, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वरळीतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यामध्ये केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरळीतील सभेला आज ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी “वरळीच्या या सभेत आमच्याकडे एकही खुर्ची रिकामी नाही. आमच्याकडे खुर्च्या गुंडाळण्याची वेळ आलेली नाही.”, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला लगावला.

हे वाचा >> अजित पवारांनी चहापाण्याचा खर्च काढून चूक केली; शिंदेंनीही उद्धव ठाकरेंच्या काळातला हिशेब मांडला, म्हणाले, “फेसबुकवर बसून…”

bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

नावात गुलाब पण वास धोतऱ्याचा

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, जळगावच्या पाटलांच्या नावात गुलाब आहे. पण वास धोतऱ्याचा येतो. त्यांनी आता शिवसेना सोडण्याचं नवीन कारण सांगितलं. ‘मी जाणार नव्हतो, मी गद्दारी करणार नव्हतो. पण मराठ्यांचा मुख्यमंत्री होतोय, म्हणून मी शिंदेसोबत गेलो.’, असं ते म्हणत आहेत. अरे दादा आता तू खरं बोलतोय की आधी खरं बोलत होतास? कारण हीच लोकं आधी म्हणत होती की, आम्हाला निधी मिळत नाही. दुसरा सांगत होता की, साहेब मला भेटतच नव्हते. तिसरा सांगत होता की, महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्यासाठी आम्ही गेलो. यांना जर महाराष्ट्राची अस्मिता एवढीच प्रिय होती, तर मग माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असताना हे लोक कुठे गेले होते? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

हे वाचा >> “एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा शिवसेनेतून बाहेर जात होता, म्हणून…”, गुलाबराव पाटलांचं गद्दारीबाबत विधान

शिंदे गटाच्या नेत्यांचं मन खातंय

“शिंदे गटाचे नेते शिवसेनेतून पडण्याची जी कारणे सांगत होते, त्यातलं एकही कारण खरं नव्हतं. नंतर म्हणाले, आम्ही हिंदुत्त्वासाठी गेलो. पण एकाही कारणावर हे लोक स्थिर राहत नाही. कारण त्यांचे मन खात आहे. प्रत्येक वेळेला त्यांना वाटतं की, शिवसैनिकांना काय सांगितल्यावर त्यांना पटेल की आम्हीच खरे आहोत. आता त्यांनी नवं कारण काढलं आहे. आता जर मराठा मुख्यमंत्र्यांचे कारण पुढे करत असतील तर आधीची सर्व कारणं खोटी होती. असं असेल तर एका अर्थाने ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याचीही दखल घ्यावी लागेल.”, अशीही टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हे वाचा >> “बरं झालं राष्ट्र द्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली”, एकनाथ शिंदेंचे अजित पवारांना जशास तसे उत्तर

आमचा नेता तुम्हाला लाईनवर आणेल

“एवढं सगळं होऊनही आमच्याकडे इनकमिंग सुरु आहे. वरळीच्या या सभेत आमच्याकडे एकही खुर्ची रिकामी नाही. आमच्याकडे खुर्च्या गुंडाळण्याची वेळ आलेली नाही. कसब्यात तुम्हाला गल्लीबोळात फिरायला भाग पाडले. तुमच्या स्तरावर आमचा नेता येणार नाही. उद्धव ठाकरेंना ममता बॅनर्जी, स्टॅलिन फोन करत आहेत. केजरीवाल तर भेटायलाच आले. उद्धव साहेब ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत, यावर बोलण्याआधी उद्धव ठाकरे तुम्हाला लाईनवर आणण्यासाठी खंबीर आहेत.”, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.