शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार कपिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच भाजपावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शाब्दिक हल्ला केला आहे. गौतमी पाटीलचा नाच गर्दी जमवण्यासाठी कपिल पाटील यांना ठेवावा लागतो आहे असंही त्या म्हणाल्या.

काय म्हटलं आहे सुषमा अंधारेंनी?

“कपिल पाटील यांना गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवावा लागतो आहे. कपिल पाटील यांनी शक्कल लढवली आहे. गौतमी पाटीलला गर्दी जमवण्यासाठी बोलवत असाल तर तुमच्या कामाचा प्रभाव काय राहिला? भाजपाने आता गौतमी पाटीलला तिकिट द्यायला पाहिजे. कपिल पाटलांना भाजपाने तिकिट देऊच नये. गौतमी पाटीलने गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी महाराष्ट्रात केला राडा. सगळ्या राजकारणाचा चिखल करुन टाकला आहे.” असं म्हणत सुषमा अंधारेंनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन कपिल पाटील आणि भाजपावर टीका केली आहे.

हे पण वाचा- Viral Video: सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं नी नेमकं वानर अवतरलं आणि.., वाचा काय घडलं?

सुषमा अंधारे या सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहेत. त्यांनी मंगळवारीही भाषण केलं. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका केली. आता सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरुन टीका केली आहे. कपिल पाटील यांची पात्रता नसेल तर थेट गौतमीलाच तिकिट द्या अशीही मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे.