प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. मागील काही दिवसांपासून वंचितचा कधी काँग्रेसबरोबर, कधी राष्ट्रवादीबरोबर तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष पाहायला मिळतो आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – महाविकास आघाडी – वंचितचे सूर जुळता जुळेना; चार निवडणुकांच्या इतिहासाची पुनरावृत्ती?

pm modi denies targeting minorities in pti interview
अल्पसंख्याकांविरुद्ध अवाक्षरही काढले नाही पंतप्रधान मोदी
Prakash Ambedkar reaction that BJP does not want nationalism anymore
भाजपला आता रास्वसं नकोसे – प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
common men suffer due to traffic jam caused by political leaders roadshow zws
अन्वयार्थ : प्रचार विरुद्ध संचार!
article 21 in constitution of india right to life and personal liberty under article 21
संविधानभान : कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती
akola vanchit Bahujan aghadi marathi news
काँग्रेस नेत्याविरोधात वंचितची पोलीस तक्रार; नेमकं प्रकरण काय? वाचा…
Hindu Manusmriti and William Jones
विश्लेषण: भारतात वादग्रस्त ठरलेली मनुस्मृती चर्चमध्ये; का आणि कशासाठी?
dalit on bjp and congress
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगावी संविधानाच्या मुद्यावरून राजकारण केल्याबद्दल दलितांमध्ये नाराजी, मुस्लिमही भीतीच्या छायेत
Union Home Minister Amit Shah on Saturday asserted that only Prime Minister Narendra Modi government has the courage to stop infiltrators in the country
आरक्षण रद्द करण्याच्या कथित व्हिडिओवर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर आरोप करत म्हणाले…

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत येताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) यांच्या पालखीचे भोई होऊ नये, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आणि विचार भारतात आणि महाराष्ट्राचा रुजवायचा असेल, तर त्या विचारधारेवर चालणाऱ्या कोणताही पक्षाने महाविकास आघाडीबरोबर यावं, वंचित बहुजन आघाडीकडेही आम्ही त्याच भूमिकेतून बघतो आहे, असेही त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा, सुषमा अंधारे म्हणाल्या..

सुषमा अंधारे या लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक नाही. तसेच कल्याण लोकसभेच्या जागेसाठी दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर केला जाईल, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – वंचितच्या मविआ प्रवेशाआधीच वाद, प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वंचितचा संताप; म्हणाले, “तुमच्यासारखे लोक…”

वंचितच्या मविआतील सहभागाबाबत साशंकता

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने जागावाटपासाठी ठेवलेल्या अटी लक्षात घेता ते महाविकास आघाडीत सहभागी होतील की नाही, याबाबत साशंकता आहे. महाविकास आघाडीला वंचितने २७ जागांवर आम्ही लढण्याची तयारी केल्याचे पत्र दिले आहे. प्रत्यक्ष किती जागा पाहिजेत याची मागणी केलेली नसली तरी २७ जागांचा प्रस्ताव देऊन फक्त दोन-तीन जागा स्वीकारणार नाही हा सूचक संदेश दिला आहे.