” जिल्हा रुग्णालय आग प्रकरण ” इतर कर्मचाऱ्यांची अद्याप  पुनर्स्थापना  नाही

नगर : जिल्हा सरकारी रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत हलगर्जीपणा दाखवल्याचं कारणाचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केले आहे. डॉ. पोखरणा यांना शिरूर (पुणे) ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. या आगीच्या घटनेत निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप पुनर्स्थापना दिलेली नाही. शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरच्या सकाळी आग लागून १४ करोना रुग्णांचा बळी गेला. यासंदर्भात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख व चन्ना आनंद या चौघांना अटक केली. नंतर आरोग्य विभागाने या चौघांसह डॉ. ढाकणे यांनाही निलंबित केले. नंतर काही दिवसांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांनाही निलंबित करण्यात आले तसेच पोलिसांनीही डॉ. पोखरणा यांचा आरोपी म्हणून समावेश केला.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Rosary School Director s Arrest Court Extends Vinay Arhana s Custody in Loan Misappropriation Case
रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हानाच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

काल, मंगळवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द केले असून त्यांना शिरूर येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार निलंबन रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) १९७९ मधील चारच्या पोटनियम पाच खंड (क) अन्वये राज्यपालांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून हे निलंबन रद्द करण्यात आल्याचे पत्र पत्रात नमूद करण्यात आले आहे.  यापूर्वी निलंबनाची कारवाई केलेल्या डॉ. विशाखा शिंदे या आरोग्य विभागाच्या कर्मचारी नसल्याचे, त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रुग्णालयात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावरील तसेच डॉ. ढाकणे यांच्यावरील कारवाई यापूर्वीच मागे घेण्यात आली होती. ढाकणे यांची विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच सपना पठारे यांच्यावरील निलंबनाची कारवाई अद्याप मागे घेतली गेली नाही, त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आस्मा शेख व चन्ना आनंद हे कंत्राटी कर्मचारी असल्यामुळे त्यांची सेवा समाप्त केली गेली आहे.