अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह वनपरिक्षेत्रांतर्गत असेरी बीटमधील वन खंड क्रमांक १६९ मध्ये चार ते पाच वर्षे वयाचा नर बिबट आणि दीड ते दोन वर्षे वयाची मादी बिबट वेगवेगळय़ा ठिकाणी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शवविच्छेदनादरम्यान या बिबटय़ांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृत बिबटय़ांचे सर्व अवयव शाबूत असून त्यांच्या शरीरावर कुठलीही जखम आढळून आली नाही. या बिबटय़ांचा मृत्यू साप चावल्याने किंवा एखाद्या अज्ञात आजाराने व शारीरिक अंतर्गत दुखापतीने झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय विषप्रयोगाची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. मृतावस्थेत आढळून आलेल्या दोन बिबटय़ांच्या पार्थिवावर सेमाडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अतुल प्रभाकरराव कडू आणि वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार पार पडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious death of male and female leopard in melghat forest area ysh
First published on: 07-12-2022 at 00:02 IST