कर्जत: पंजाब मधील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकार देत असलेल्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी व सरदार डल्लेवाल यांनी उपोषण सोडावे यासाठी आज  दिनांक २० जानेवारी रोजी, महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने  करण्यात आले .

यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट म्हणाले की,पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे एक वर्षा पासून सुरू आहे. कृषी मंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी त्यांची रास्त अपेक्षा आहे. अकरा महिने झाले तरी केंद्र सरकार या आंदोलनाची दखल घेण्यास तयार नाही असे पाहून भारतीय किसन युनियन (अराजनैतिक) या संघटनेचे अध्यक्ष सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांनी उपोषणाला सुरु केले. आज पंचावन्न दिवस उलटून गेले तरी सरकार बोलणी करण्यास तयार नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Commissioner and Administrator of Ichalkaranji Municipal Corporation Omprakash Divate
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकांचा पदभार काढून घेतला
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
pimpri chinchwad municipal corporation news
पिंपरी : शहराची लोकसंख्या ३० लाख आणि पहिल्या लोकशाही दिनात केवळ दोन तक्रारी
Marathi mandatory in government offices news in marathi
सरकारी कार्यालयात ‘मराठीतच बोला!’ कर्मचारी मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई
Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
scheme, Tax, Nagar Parishad, Nagar Panchayat,
थकीत कर! राज्यात नगरपरिषद, नगर पंचायतीमध्ये राबविणार ‘ही’ योजना…
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 

हेही वाचा >>>रत्नागिरी : कोंबड्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या अडकला खुराड्यात

एका शेतकरी आंदोलनाला ज्या पद्धतीने सरकार वागणूक देत आहे  हे निषेधार्ह आहे. शांततेच्या मार्गाने अतिशय अहिंसक पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे. देशाचे पंतप्रधान किंवा कृषी मंत्र्यांनी त्यांच्या शिष्टमंडळा बरोबर चर्चा करावी. जे शक्य असेल ते मंजूर करावे, नसेल ते का करता येत नाही ते समजून सांगावे असे मत श्री घनवट यांनी अहील्यानगर येथे झालेल्या आंदोलनात केले. पूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी एकजूट होऊन सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध  करायला हवा. आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन एक किमान समान कार्यक्रम घेऊन सरकारकडे शेतकरी हिताचे धोरण तयार करण्यास भाग पाडले पाहिजे असे ही ते म्हणाले.

अहील्यानगरसह महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात लाक्षणिक उपोषणाचे आंदोलन करण्यात आले.अहील्यानागरचे  जिल्हाधिकारी  यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.जिल्हाधिकारी कार्यालय समोर झालेल्या आंदोलनात  अनिल घनवट, विक्रम शेळके, नीलेश शेडगे, वामनराव भदे, ऍड कारभारी गवळी, अशोक सब्बान, सुनीता वानखेडे, नवनाथ दिघे, शीतल पोकळे, बाळासाहेब सातव, अंबादास  चव्हाण, पांडुरंग पडवळ, महादेव खामकर, बाबासाहेब रिकामे, कारभारी कणसे, डॉ. संजय कुलकर्णी  सहभागी झाले होते.

Story img Loader