scorecardresearch

हिंदू गर्जना मोर्चात तलवार फिरविली; राष्ट्रवादी नेत्याचा पुत्र अडचणीत

माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे तलवार बाळगून हवेत फिरविल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.

Swords ncp leader son solapur
हिंदू गर्जना मोर्चात तलवार फिरविली; राष्ट्रवादी नेत्याचा पुत्र अडचणीत (image source – Prathamesh Kothe/ Facebook)

सोलापूर : दोन दिवसांपूर्वी सोलापुरात संघ परिवाराने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आयोजिलेल्या हिंदू गर्जना मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी महापौर महेश कोठे यांचा सहभाग सार्वत्रिक चर्चेचा विषय ठरला असतानाच, याच मोर्चात सहभागी झालेले त्यांचे पुत्र, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे तलवार बाळगून हवेत फिरविल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.

हेही वाचा – “आमची लढाई चोर, डाकू अन् त्यांच्या…”; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र!

हेही वाचा – ‘बॉम्बे’चे मुंबईनंतर तीन दशकाने राज्यातील शहरांचे नामांतर

फौजदार चावडी पोलीस ठाण्यात प्रथमेश कोठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक विनोद व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथमेश कोठे हे हिंदू गर्जना मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चा माणिक चौकात पोहोचला असता प्रथमेश कोठे यांनी मोर्चात लाल वेष्टनात गुंडाळून आणलेली तलवार हातात बाळगली आणि मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमध्ये तलवार हवेत फिरविली. यात पोलीस प्रशासनाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 11:30 IST
ताज्या बातम्या