चंद्रपूर : कच्चा रस्ता व पावसामुळे ताडोबाच्या कोअर क्षेत्रात पर्यटन सफारी अडचणींची व धोक्याची असल्यामुळे १ जुलैपासून ताडोबाचे कोअर क्षेत्र पर्यटन सफारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मात्र, ताडोबाच्या गाभा क्षेत्राबाहेरील बफर क्षेत्रात व्याघ्र सफारी सुरू राहणार आहे. बफर झोनच्या १३ प्रवेशद्वारावरून पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे.

ताडोबाचे गाभा क्षेत्र असलेले कोअर झोन दरवर्षी पावसाळ्यात बंद करण्यात येते. कोअर झोन तीन महिन्यांसाठी बंद असते. मात्र, ताडोबाच्या बफर क्षेत्रातसुद्धा सफारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ताडोबाच्या बाह्य क्षेत्रात पर्यटकांना पर्यटनांचा आनंद लुटता येणार आहे. ताडोबाच्या कोअर क्षेत्रातील १३ प्रवेशद्वारावरून पर्यटकांना सफारी करता येणार आहे. ही सर्व प्रवेशद्वारे वर्षभर पर्यटकांसाठी खुली असतात. यामध्ये मोहर्ली बफर झोनमधील जुनोना, देवाडा, अडेगाव, आगरझरी, तर पांगडी बफर क्षेत्रातील पांगडी, अस्वल, चुहा, झरी, केसलाघाट, झरीपेठ, मामला आणि कोलारा बफरझोनमधील कोलारा, चारूरदेव, अलिझंजा, मदनापूर, शिरखेडा, तसेच नवेगाव बफरमधील नवेगाव, रामदेगी, निमडेला या १३ प्रवेशद्वावरून पर्यटकांना सफारी करता येणार आहे. बफर क्षेत्राच्या पर्यटनासाठी पर्यटकांना ऑनलाईन अथवा प्रवेशद्वारावर जाऊन नोंदणी करता येणार आहे. ताडोबाच्या कोअर क्षेत्रात मार्च २०२२ ते मे २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८० हजार पर्यटकांनी भेट दिली आहे.
पावसाळा वाघाचा प्रणयकाळ

Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

पावसाळा हा वाघ, मोर व अन्य वन्यप्राण्यांचा प्रणयकाळ असतो. शिवाय ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील रस्ते पावसामुळे चिखलमय होऊन वाहनांसाठी योग्य नसतात. त्यामुळे गाभा क्षेत्रातील पर्यटन बंद करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने निर्देश दिले आहेत.