शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता ऑनलाईन

आंतरजिल्हा बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारी समोर येत असत.

राज्यातील जिल्हा परीषदेच्या  शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन होणार आहेत.  शासनाकडून प्रत्यक्षात या निर्णयाच्या अंमलबजावणीला देखील सुरूवात झाली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीत होणाऱ्या गरप्रकारांना आता चाप बसणार आहे . महत्वाची बाब म्हणजे यंदा रायगड जिल्हा परीषदेच्या शाळांमधील तब्बल ५४४ शिक्षकांच्या  आंतरजिल्हा बदल्या  या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळांवर शिक्षक म्हणून नेमणूक झालेल्या अन्य जिल्ह्यतील शिक्षक हे आपल्या मूळ जिल्ह्यत वा सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अर्ज करीत असतात.

शिक्षकांच्या या अर्जावर अधिकारी हे अनेक वेळा आक्षेप घेतात. अशावेळी बदली मागणारे शिक्षक योग्य वजन वापरून आपली बदली करून घेत असत. अशा बदल्यांमध्ये अनेकदा राजकीय हस्तक्षेप आणला जात असे.

त्यामुळे आंतरजिल्हा बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारी समोर येत असत. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यामधील गरप्रकारांना चाप लावण्याचा निर्णय आता राज्यसरकारने घेतला आहे. शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण सचिवांनी याबाबत एक परिपत्रक काढले आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आंतर जिल्हा बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरले असून शासनामार्फत ऑनलाईन बदल्याची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे बदली प्रकरणात गरप्रकार करणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

महत्वाची बाब म्हणजे आंतरजिल्हा बदलीसाठी कोणत्या शिक्षकाने अर्ज केला आहे, याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला बदली झाल्यानंतरच मिळणार आहे, त्यामुळे शिक्षकांच्या बदलीतील स्थानिक हस्तक्षेपच निकाली निघणार आहे.

दरम्यान रायगड जिल्हा  परिषदेच्या  शाळांमधील ५४४ शिक्षकांच्या बदल्यात ऑनलाईन पद्धतीने झाल्या  आहेत. मात्र त्यांना जिल्हा परिषदेने सोडले नसल्यामुळे अद्याप या शिक्षकांना संबंधित जिल्ह्य़ात रुजू होता येणार नाही.  रायगड जिल्हा  परिषदेच्या शिक्षण समितीने तसा ठराव घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या  शाळांमध्ये शिक्षकांच्या जवळपास ११०० जागा रिक्त होणार आहेत. त्यामुळे हे शिक्षक जिल्ह्य़ाबाहेर गेले तर जिल्ह्य़ाातील प्राथमिक शिक्षणाची मोठी पंचाईत होणार आहे. त्यामुळे नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बदली झालेल्या शिक्षकांना सोडायचे नाही,असा ठराव जिल्हा  परिषदेच्या शिक्षण समितीच्या बठकीत घेण्यात  आला आहे. ‘ आंतरजिल्हा बदली ही अतिशय वेळ खाऊ पद्धती होती.  परंतु आता ऑनलाईनमुळे ती अधिक सोपी झाली आहे. महत्वाचे म्हणजे यातील मानवी चुका आणि हस्तक्षेप  पूर्णपणे थांबणार आहे . शिवाय कालापव्य देखील होणार नाही  ’

शेषराव बडे , शिक्षणाधिकारी प्राथमिक, रायगड जिल्हा परिषद 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Teacher transfers are now online

ताज्या बातम्या