उरण तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या, विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांना अलिबाग सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दोघांनाही दोन स्वतंत्र गुन्ह्य़ांमध्ये प्रत्येकी १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दत्ता सोमनाथ जाधव आणि वनिता वसंत पाटील अशी या दोन आरोपी शिक्षकांची नावे आहेत.
हे दोघेही उरण तालुक्यातील एका गावातील प्राथमिक शाळेत अनुक्रमे शिक्षक आणि मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. याच शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर शिक्षक दत्ता जाधव यांनी बलात्कार केला होता, तर अन्य पाच मुलींचे लैंगिक शोषण केल्याची बाब २०१३ मध्ये उघडकीस आली होती. या सर्व प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता पाटील यांनी जाधव यांना सहकार्य केले होते. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.अलिबागच्या जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची इन कॅमेरा सुनावणी पार पडल्याचे वकिलांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2014 रोजी प्रकाशित
विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणप्रकरणी शिक्षकांना १० वर्षांची सक्तमजुरी
उरण तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या, विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांना अलिबाग सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
First published on: 29-10-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teachers get 10 years imprisonment in students sexual abuse case