MLC Election Result : गेल्या काही दिवसांपासून शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली होती. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. यासह अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

Live Updates

Teachers-Graduate MLC Election Live Update: शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?

10:34 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: “..म्हणून मीच विजयी होणार”, शुभांगी पाटील यांनी सांगितलं गणित!

विजय फार दूर नाही. फार चांगल्या मतांनी हा विजय होईल. मतदान १ लाख २९ हजार ४५६ इतकं झालं आहे. त्यातून बाद होणाऱ्या मतांनंतर कोटा ठरवला जाईल. जे प्रमाण ठरवलं जाईल, त्यानुसार विजयी उमेदवार ठरेल. त्यानुसार विजयासाठी जो कोटा आहे, त्यापेक्षा जास्त मतदारांना मी वैयक्तिकरीत्या ओळखते. त्यामुळे विजय माझाच आहे – शुभांगी पाटील

10:13 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमरावतीमध्ये २६५ पोस्टल मतांची मोजणी पूर्ण

अमरावतीमध्ये २६५ पोस्टल मतांची मोजणी पूर्ण

10:04 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: “मराठवाड्यात यंदा परिवर्तन होणार”, किरण पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

आम्हाला १०० टक्के खात्री आहे. निश्चितपणे यावेळी मराठवाड्यात परिवर्तनाची लाट दिसतेय. भाजपा आणि शिवसेना आघाडीचा विजय होईल – भाजपा उमेदवार किरण पाटील

09:55 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: पोस्टल मतांनंतर आता मुख्य मतमोजणीला सुरुवात!

नाशिकसह पाचही मतदारसंघात पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली असून या ठिकाणी आता नियमित मतांच्या मोजणीला सुरुवात झाली आहे.

09:09 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: शुभांगी पाटील यांना विजयाचा विश्वास!

नाशिकमधील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. नाशिकच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या होत्या. त्यामुळे इथल्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

08:29 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: पुण्यात निकालाआधीच तांबेंच्या विजयाचे पोस्टर

पुण्यामध्ये सत्यजीत तांबेंच्या विजयाचे पोस्टर झळकले असून त्यामुळे अनेकांच्या भुवयाय उंचावल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत आहे.

08:06 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: मी आमदार झाल्याशिवाय मरणार नाही – रवींद्र डोंगरदेव

आमदार झाल्याशिवाय रवींद्र डोंगरदेव मरणार नाही हे लक्षात ठेवा. मी सुरुवात कमी वयात केली आहे. नक्कीच आयुष्यात यशस्वी होणार. मी वेळेत सुरुवात केली. चांगली सुरुवात अर्ध यश असतं. पुढच्या वेळी रवींद्र डोंगरदेव आमदार असणारच. – अपक्ष उमेदवार रवींद्र डोंगरदेव

08:04 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: पाच मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे निकाल आज हाती येणार असून नागपूर, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या पाच मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

08:01 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: सध्या या पाच मतदारसंघात कोण आहेत आमदार?

नाशिक – नाशिकमध्ये काँग्रेसकडून सुधीर तांबे आमदार होते. मात्र, बंडखोरीनंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं.

अमरावती – अमरावतीमध्ये भाजपाकडून रणजीत पाटील आमदार होते.

कोकण – कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आमदार होते.

नागपूर – नागपुरात भाजपाच्या पाठिंब्यावर अप आमदार नागो गाणार गेल्या निवडणुकीत जिंकून आले होते.

औरंगाबाद – औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आमदार होते.

07:59 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कुठे, कुणामध्ये कशी आहे लढत? – कोकण

कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघात मविआचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे.

07:59 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कुठे, कुणामध्ये कशी आहे लढत? – औरंगाबाद

औरंगाबादमध्येही नागपूरप्रमाणेच तिहेरी लढत आहे. राष्ट्रवादीकडून विक्रम काळे, भाजपाकडून किरण पाटील आणि बंडखोर अपक्ष म्हणून प्रदीप सोळुंखे मैदानात आहेत.

07:58 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कुठे, कुणामध्ये कशी आहे लढत? – अमरावती

अमरावती पदवीधर मतदारसंघात मविआचे धीरज लिंगाडे यांच्याविरुद्ध भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यात लढत आहे.

07:57 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कुठे, कुणामध्ये कशी आहे लढत? – नागपूर

नागपूरमध्ये तिहेरी लढत दिसून येईल. काँग्रेसचे सुधाकर आडबाले, भाजपाकडून नागो गाणार आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे मैदानात आहेत.

07:56 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कुठे, कुणामध्ये कशी आहे लढत? – नाशिक

नाशिकमध्ये अपक्ष सत्यजीत तांबे आणि मविआच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत…

07:51 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कोण कुणाचा वारसा सांगत होतं, मी तर संघर्षाचा वारसा सांगत होते. – शुभांगी पाटील

मी पदवीधर, शिक्षक, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मी सोडवले होते. आमदार नसताना मी अनेक कामं केली आहेत. त्यामुळे आमदार नसतानाही मी काम करेन असा विश्वास लोकांना वाटत होता. कोण कुणाचा वारसा सांगत होतं, मी तर संघर्षाचा वारसा सांगत होते. – शुभांगी पाटील

07:50 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: जनतेचा कौल माझ्या बाजूने – शुभांगी पाटील

जनतेचा कौल शुभांगी पाटील यांच्या बाजूनेच आहे. ही निवडणूक जनतेनंच हाती घेतली होती. जनता पूर्णपणे माझ्या बाजूने होती. बुथही जनतेनं स्वत: लावले होते. मला भेटण्यासाठी रस्त्या-रस्त्यावर लोक उभे होते. – शुभांगी पाटील

07:49 (IST) 2 Feb 2023
Nashik Graduate Constituency Election : “…त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली; विजय तर अगोदरच…” सत्यजित तांबेंचं मोठं विधान!

“ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला निकालातून दिसेल. विजय अगोदरच झालेला आहे”, सत्यजीत तांबेंचं विधान

वाचा सविस्तर

Maharashtra mlc election result 2023 Live: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल

Teachers-Graduate MLC Election Live Update: शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?