मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलं आहे. सध्या मनोज जरांगेंनी त्यांचं उपोषण स्थगित केलं असलं तरीही त्यांनी आरक्षणासाठीचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तर, दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरता आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरता आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास्थळी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि बीडचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांच्यावतीने सरकारला जाब विचारला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “दोन दिवस झाले मी अत्यंत विचित्र दिव्य दुःखी भावनांना सामोरे गेले आहे. मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण रडायला लागले. तुमच्या पराभवामुळे चार लोकांनी आत्महत्या केल्या, मला बघून रडू येतंय. परिस्थिती हाताळत असल्याने याला कोणतंही राजकीय वळण लागू नये. फक्त वंचित लोकांसाठी लढणाऱ्या माझ्या भावांकडे जाऊन त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकते आणि ते सरकारसमोर मांडण्याचा शब्द देते. धनंजय भाऊ कृषी मंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. त्यामुळे सरकारला तिथे जाऊन सांगण्याची गरज नाही. मी त्यांना इथंच सांगते.”

Chhagan Bhujbal and Manoj Jarange
“छगन भुजबळांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागणार, मोठं इंजेक्शन…”, मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले, “कितीही आडवे या…”
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Rahul gandhi
राहुल गांधींचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? ‘या’ तीन तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा
Sushma andhare
“देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून…”, सुषमा अंधारेंचा गंभीर दावा; म्हणाल्या, “त्यांची वाढती नकारात्मक छबी…”
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Praful Patel
अजित पवार गटातून केंद्रात कोण मंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रीपद मिळणार असेल तर ते…”

हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून…”, सुषमा अंधारेंचा गंभीर दावा; म्हणाल्या, “त्यांची वाढती नकारात्मक छबी…”

ओबीसी समाजाच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत

“माझी मागणी सर्वात महत्त्वाची आहे. आज माझं म्हणणं सर्वांनी ऐकावं अशी विनंती आहे. आंदोलन देशात कुणीही करु शकतं. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसून न्याय देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मी कुठली प्रतिनिधी म्हणून येथे आलेले नाही. तर मला असं वाटलं की, इथेसुद्धा मोठ्या नेत्यांनी येऊन आंदोलकांच्या भावना ऐकून घेतल्या पाहिजेत आणि न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे”, असंही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

सरकारने या दोघांचंही उपोषण सोडवावं

“लक्ष्मण हाके यांनी आज पाणी सोडलं आहे. चेहरे टवटवीत आहे, कारण संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. डोंगर, कपाऱ्यात जाऊन जीवन बनवणारा हा माझा वंचित समाज आहे. या समाजाचा काय आवाज आहे, तो आवाज सरकारने ऐकायलाच पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे, ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजवून सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. सरकारने या दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं. ज्याप्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याच प्रमाणे यांचं उपोषण सोडवलं जावं”, असं आवाहनही पंकजा मुंडेंनी सरकारला केलं आहे.