सोलापूर शहरात आज ४२ तर जिल्हा ग्रामीणमध्ये १५१ असे मिळून १९३ नवे करोनाबाधित रूग्ण  आढळले. दहा रूग्णांचा मृत्यू झाला. यात ग्रामीणमधील आठ मृतांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात करोनाबाधित रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

आज जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्या करोनाबाधित रूग्णांमध्ये बार्शीतील सर्वाधिक ६४ रूग्णांचा समावेश आहे. तर पंढरपुरात २५, माढ्यात २१ रूग्ण सापडले. शहर व जिल्ह्यात मिळून आता ९ हजार २३७ रूग्णसंख्या झाली आहे. तर मृतांचा आकडा ४८७ वर पोहोचला आहे. तर करोनामुक्त होण्याची संख्या ५ हजार ६०१ झाली आहे. शहरातील ३ हजार २५२ आणि ग्रामीणमधील २ हजार ३४९ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्याचे एकूण प्रमाण ६०.६३ टक्के एवढे आहे.

शहरातील मृत्युचे प्रमाण अद्याप ७.१३ टक्के असून ते आजही राज्यात सर्वाधिक आहे. ग्रामीणमधील मृत्युंची संख्या वाढली असली, तरी त्याचे शेकडा प्रमाण अद्याप २.९३ वर आहे. शहर व जिल्ह्यात मिळून मृत्युचे प्रमाण ५.२७ टक्के आहे.