श्रीरामपूरला १२ ला ठाकरे-मुंडे यांची सभा

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शहरात येत्या दि. १२ ला पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शहरात येत्या दि. १२ ला पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
लोखंडे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदत संपण्याच्या आदल्या दिवशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली. शेवटच्याच दिवशी अर्ज दाखल करून ते नंतर प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे अद्याप प्रचारात गती आलेली नाही. प्रचाराचा शुभारंभ नुकताच झाला. निवडणूक आयोगाकडून प्रचाराच्या वाहनांसाठी अद्याप परवाने मिळाले नसल्याने जाहीर प्रचारास प्रारंभ झाला नाही. आज परवानगी मिळाल्यानंतर उद्यापासून प्रचाराची वाहने कार्यरत होणार आहे. शहरात मंगळवार दि. ८ ला व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच सेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे यांची सभा होणार आहे. सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भीमराज बागूल यांनी केले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात पूर्वी माजी मंत्री बबन घोलप यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांनी तब्बल पंधरा ते वीस दिवस येथे प्रचारालाही गती दिली. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच जुन्या एका संपत्तीच्या खटल्यात त्यांना तीन वर्षांची शिक्षा झाली. मुंबई न्यायालयाच्या या निकालामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली, मात्र त्यामुळे लोखंडे यांची उमेदवारी जाहीर होण्यास बराच विलंब झाला. युतीच्या राज्यातील निवडक उमेदवारांसाठीच ठाकरे व मुंडे यांच्या एकत्रित सभा होणार आहेत, त्यात आता शिर्डीचा समावेश आहे.    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thackeray and munde on 1 in shrirampur

ताज्या बातम्या