scorecardresearch

Premium

“महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात…”, ३७०० कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत राऊतांचा गंभीर आरोप

३७०० कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत संजय राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

sanjay raut (6)
संजय राऊत (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार जोरदार टीकास्र सोडलं आहे. देशातील महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून दंगली पेटवण्याचं काम सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, त्यांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा आरोप केला.

यावेळी खासदार संजय राऊत म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत जेवढा भ्रष्टाचार झाला, तेवढा ब्रिटिशांनीही त्यांच्या काळात केला नसेल. काल गुजरातच्या मंत्रालयात नवीन घोटाळा उघडकीस आला आहे. भाजपाचा मित्र असलेल्या उद्योगपतीला ३७०० कोटींचा फायदा मिळवून दिला आहे. शक्तिसिंह गोयल यांनी बाहेर काढलेलं हे प्रकरण गंभीर आहे. अशी रोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. दररोज भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. केंद्रातील प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार आहे.”

jayant patil
“शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणात फरक हाच की…”, जयंत पाटलांचं विधान
devendra fadnavis sharad pawar ajit pawar
VIDEO : “तपास यंत्रणांच्या भीतीनं अजित पवार गट भाजपाबरोबर”, शरद पवारांच्या विधानाला फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…
chandrashekhar bavankule, 10 mla joins bjp, list of 10 mla joining bjp, chandrashekhar bavankule on ajit pawar
“भाजप प्रवेशासाठी १० आमदारांची यादी तयार, उर्वरीत राष्ट्रवादीचा लवकरच अस्त”, बावनकुळेंची प्रतिक्रिया
ROHIT PAWAR and AJIT pawar
“सत्तेत सहभागी होण्यास रोहित पवारांनीच सर्वप्रथम समर्थन दिलं”, अजित पवार गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

हेही वाचा- उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश

“देशात महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे दंगली पेटवायच्या. लव्ह जिहाद सारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे. मोर्चे काढायचे. हे कितीही केलं तरी २०२४ साली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत येणार नाही, अशी गॅरंटी ‘इंडिया’ आघाडीतर्फे आम्ही देत आहोत,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thackeray faction mp sanjay raut allegations 3700 crore scam in ministry bjp rmm

First published on: 27-08-2023 at 10:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×