लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापुरातील महाविकास आघाडीतील वाद विकापोला गेला आहे. आघाडीच्या उमेदवाराविरुद्धच काँग्रेसने उभे केलेले बंडखोर, यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेला इशारा, दुसरीकडे डाव्या आघाडीचे उमेदवार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर झालेली दगडफेक यातून आघाडीतील मतभेद हिंसेवर आलेले असताना बुधवारी ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे. पक्षाचे सहसंपर्कप्रमुख, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी ही घोषणा केली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

सोलापूर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपापासूनच मतभेदांना सुरुवात झालेली होती. जागावाटप झाल्यानंतर या मतभेदांनी वादाचे रूप धारण केले. बहुतांश मतदारसंघांत अधिकृत उमेदवाराविरुद्ध आघाडीतीलच अन्य पक्षाच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरीनंतर हे पक्ष आघाडीचा प्रचार करण्याऐवजी आपल्या पक्षाच्या बंडखोराच्या प्रचारातच गुंतलेले आहेत. हा सर्व प्रकार वाढत गेल्यावर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला आघाडी धर्माची आठवण करून देत तातडीने सुधारणा करण्याचा इशारा दिला. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभेत कानउघाडणीदेखील केली. परंतु हे सर्व झाल्यावरही सोलापुरात कॉंग्रेस पक्ष त्यांच्याच बंडखोराच्या प्रचारात सहभागी होत आघाडीपासून दूर राहिल्याने शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) संताप व्यक्त होऊ लागला होता. याचीच परिणती आज ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे.

आणखी वाचा-Nitin Gadkari : योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’पेक्षा गडकरींची भूमिका वेगळी? म्हणाले, “निवडणुकीत एकाच मुद्यावर यश मिळेल”

सोलापूर दक्षिण विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला होता. शेवटी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली असून, तेथे या पक्षाचे अमर रतिकांत पाटील हे उभे आहेत. परंतु काँग्रेसकडून अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष धर्मराज काडादी यांचा प्रचार केला जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने व पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व इतर बहुसंख्य पदाधिकारी-कार्यकर्ते काडादी यांच्या प्रचारात पूर्णवेळ सक्रिय आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे एकटेच अमर पाटील यांच्या प्रचारात दिसून येतात. खासदार प्रणिती शिंदे आघाडीचा धर्म न पाळता शिवसेनेच्या प्रचारापासून दूर आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी उद्धव ठाकरे यांना भेटून, खासदार प्रणिती शिंदे लवकरच शिवसेनेच्या प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले होते. परंतु खासदार शिंदे सोलापुरात असूनही सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेच्या प्रचारात उतरल्या नाहीत. त्यांचे वडील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही शिवसेनेच्या प्रचारापासून अंतर राखले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसांनी पुन्हा सोलापुरात आल्यावर कॉंग्रेस आणि शिंदे कुटुंबीयांचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

आणखी वाचा-“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी काँग्रेसच्या या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि शिंदे कुटुंबीयांचा निषेध करत आमचा पक्ष, सर्व शिवसैनिक आता काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचे काम करणार नाहीत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आम्ही काँग्रेसवर बहिष्कार घालत असल्याचे खंदारे यांनी या वेळी जाहीर केले.

Story img Loader