मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. या गुवाहाटी भेटीवरुन ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी टीकास्र सोडलं आहे. “श्रद्धा खाजगी असतात. राज्यकर्ता श्रद्धेचं प्रदर्शन करत नाही. जेव्हा श्रद्धा बाजारू रुप घेते तेव्हा महाराष्ट्राचं अहित साध्य होतं. महाराष्ट्राला मागे नेणारी माणसं देवीचा आशीर्वाद घ्यायला गेली आहेत”, असा घणाघात सावंत यांनी शिंदेंवर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सर्व विषयांमध्ये महाराष्ट्र मागे आहे. महाराष्ट्राचा अवमान करणारी माणसं यांच्या सोबत आहेत”, अशी टीका सावंतांनी केली आहे. दरम्यान, आणखी काही आमदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरही सावंत यांनी भाष्य केलं आहे. त्यांचे आमदार पळून जाऊ नये याची खातरजमा करण्यासाठीच अशा प्रकारच्या चर्चा सुरू असल्याचं सावंत म्हणाले आहेत.

“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज बुलडाणा दौऱ्यावर आहेत. चिखलीत पक्षाकडून ‘शेतकरी संवाद मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. “महाराष्ट्र अन्यायाने ग्रासला आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये आहे. लढाई सुरू करताना ज्या जिल्ह्यात गद्दार निपजले, त्यावर हा पहिला हल्ला आहे”, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.

Guwahati Visit: गुवाहाटी दौऱ्याला अब्दुल सत्तार गैरहजर; नाराजीच्या चर्चांवर स्पष्टीकरण देत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांवर माझा…”

उदय सामंतांचा मोठा दावा

शिंदे गटाच्या ४० आमदारांपैकी जवळपास पाच ते सहा आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याचं सांगितलं जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे हे आमदार येत नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. “चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group leader arvind sawant criticized eknath shinde guwahati kamakhya temple visit rvs
First published on: 26-11-2022 at 13:30 IST