"योग परंपरेला लांच्छन आणणारे रामदेव बाबांचे वक्तव्य", 'त्या' वक्तव्यावरुन नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला संतापThackeray group leader Neelam gorhe criticized Yogguru Ramdev Baba on controversial statement about women | Loksatta

“योग परंपरेला लांच्छन आणणारे रामदेव बाबांचे वक्तव्य”, ‘त्या’ विधानावरुन नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला संताप

“आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे”, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे

“योग परंपरेला लांच्छन आणणारे रामदेव बाबांचे वक्तव्य”, ‘त्या’ विधानावरुन नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केला संताप

योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निषेध नोंदवला आहे. रामदेव बाबांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे आहे, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. “योगाच्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगत असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणं अत्यंत चुकीचं आहे”, असे गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

“प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतो. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो” असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. “आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. याबाबत त्यांनी निषेध करायला हवा होता”, असंही त्या म्हणाल्या आहेत. स्त्रीचं अपहरण करण्याच्या रावणाच्या मानसिकतेचे हे आणखी एक रूप असल्याची टीकादेखील त्यांनी केली आहे.

महिलांच्या कपड्यांविषयीच्या ‘त्या’ विधानामुळे रामदेव बाबा अडचणीत; महिला आयोगानं पाठवली नोटीस, दोन दिवसांत…

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

“महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी ठाण्यात केले होते. या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. या संमेलनात रामदेव बाबांनी हे आक्षेपार्ह विधान केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 14:02 IST
Next Story
VIDEO: भर पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक का केली? संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणाले, “भाजपाचं पिल्लू…”