मुंबई : ठाणे ते मानखुर्द उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असून आता या पुलाच्या कामातील अंत्यत कठीण आणि आव्हानात्मक कामाला सुरुवात करण्यात आली आहे. १४ मीटर उंच अशा डबल डेकर उड्डाणपूलातील सेंट्रल ऑब्लिगेटरी स्पॅन बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काम पुढील २० दिवसात पूर्ण करून हा उड्डाणपूल जानेवारीच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला झाल्यास मानखुर्द ते ठाणे प्रवास सुकर होणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: नव्या वर्षात मुंबई उपनगरीय स्थानकात ३० सरकत्या शिड्या; स्थानकात आबालवृद्धांचा प्रवास सुकर होणार

Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

पूर्वमुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांना छेडा नगर जंक्शन येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहे. यापैकी पहिला तीन मार्गिकांचा ६८० मीटर लांबीचा पूल शीव आणि ठाण्याला जोडणारा आहे. दुसरा दोन मार्गिकेचा १,२३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द रोडपासून थेट ठाण्याला जोडण्यात येणार आहे. तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझपासून चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात येणार आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यापैकी ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्चमध्ये वाहतुकीस खुला झाला. सांताक्रूझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पास हा उड्डाणपूल जोडण्यात आला असून हा पूल खुला झाल्याने छेडा नगर येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होत आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांबीच्या आणि ३७.५ मीटर रुंदीच्या सब-वेचा पहिला टप्पाही पूर्ण झाला असून तो वाहतूक सेवेत दाखल झाला आहे.