महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावरून आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसह अन्य निवडणुकांशी सुद्धा याचा संबंध जोडला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी या भेटीचे नेमके कारण काय होते, याबाबत माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे यांनी कोकण महामार्गाच्या संदर्भात माझी भेट घेतली होती. कारण कोकण महामार्गाचं काम जरा अर्धवट असल्याने, ते नुकतेच तिकडून आले तर ते म्हणाले की मला असं वाटलं तुम्हाला भेटून हे सांगावं, की काम वेगानं झालं पाहिजे. मी त्यांना सांगितलं की या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. काही काँट्रॅक्टरच्या अडचणी होत्या त्या त्यांनी दूर केल्या. ते स्वत:ही गडकरींशी बोलणार आहेत आणि आम्हीदेखील ते काम कसं वेगाने पूर्ण होईल तसा प्रय़त्न करणार आहोत.”

Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

हेही वाचा – “जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्यासाठी …”- महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं विधान!

कोकण दौऱ्यावर असताना राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांवरुन टोलेबाजी करताना “गेल्या दोन-अडीच वर्षांपासून निवडणुकांची पाईपलाईन तुटली आहे” असं राज ठाकरे म्हणाले होते. याशिवाय आगामी वर्षात फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणुका होण्याचा कयासही त्यांनी वर्तवला होता. तर येत्या जानेवारीमध्ये पुन्हा कोकण दौरा करणार असल्याचं ठाकरेंनी यावेळी सांगितलं होतं. या दौऱ्यात मराठी माणूस, हिंदुत्वासह राज्यातील अनेक विषयांवर भूमिका मांडणार असल्याचं ते म्हणाले होते.