scorecardresearch

“अवकाळी पावसाने खचलेल्या बळीराजाला सरकारने मदत देऊन…..” विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

जाणून घ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?

What Ajit pawar Said?
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

६ ते ९ मार्च या कालावधीत हवामान बदलणार आहे आणि वादळवारा, अवकाळी पाऊस येईल हे सांगितलं गेलं होतं. ते महाराष्ट्रात घडलं आणि शेतकरी राजाचं, बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. आंब्याचा मोहोर, हरभरा, गहू मका, ज्वारी पिक, भाजीपाला, द्राक्षं अशी अनेक पिकं यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्या खचलेल्या बळीराजाला मदत करा असं आवाहन आम्ही सरकारला करणार आहोत असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.

काय म्हटलं आहे अजित पवार यांनी?

मी मंगळवारी पाथर्डी आणि नगर दौऱ्यावर होतो तिथे काही लोकांनी मला निवेदनं दिली. मी स्वतःही सगळी स्थिती पाहात होतो. आज दुसऱ्या आठवड्याच्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. काही ठिकाणी क्लीप फिरत आहेत. सगळं पिक पडलं आहे आणि स्वतः त्यावर तो आडवा पडून चेहऱ्यावर मारून घेतो आहे. हे खूप हृदय पिळवटून टाकणारं चित्र आहे. सरकारला किती नुकसान झालं आहे याचा अंदाज आलेला नाही.

होळीचे रंग खेळा, पण शेतकऱ्यांना मदतही करा

मंगळवारी बरेच मान्यवर नेते, होळी असल्याने त्यानंतर धुळवड असल्याने रंग लावण्याच्या आनंदात सहभागी झाले होते. होळी-धुळवड हे सण साजरे झाले पाहिजेत, आनंदात सहभागी झालं पाहिजे पण महाराष्ट्रातला बळीराजा चिंतातूर झाला आहे. खचून गेला आहे, त्याला उभारी देण्याचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

६ तारखेपासून ते ९ तारखे पर्यंत हवामान बदलले जाईल शेतकरी वर्गाचे हरभरा , मका , भाजीपाला, पिकाचे द्राक्षे कांदा या अनेक पिकांचे नुकसान झाले. लोकांनी मला त्याबद्दल निवेदने दिली आहेत. सरकार काही मदत करते का आम्ही मागणी करणार आहोत. अधल्या दिवशी होळी असल्या कारणाने मान्यवर नेते त्यामध्ये गुंतलेले होते. अनेक ठिकाणच्या बळीराजा चिंताधूर झालेला आहे. अतिशय नाराज झालेला आहे. खचून गेलेला आहे त्याला उभारी देण्याचे काम राज्य सरकारने केले पाहिजे. अशी माझी स्पष्ट मागणी आहे. हाता तोंडाशी आलेली पिके गहू हरभरा जी काही पिके आहेत. त्या सगळ्या पिकाला कापसाला नुकसान झालेले आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाले त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्याला बसला आहे. यासाठी पीक विमा उतरवणे आणि NDRF कायदा बदलेले आहेत. त्याप्रमाणे मदत मिळाली पाहिजे. हे सरकारचं काम सरकारने करावं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही मदत देतो असं हे सरकार म्हणतं आहे पण प्रत्यक्षात कुठेही मदत मिळालेली नाही. आमच्या सरकारच्या काळात तातडीने मदत दिली जात होती. आता तसं होताना दिसत नाही हे शेतकरीच आम्हाला सांगत आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

जागतिक महिला दिनाच्या दिवशी महीला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महीला मंत्री नाही हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही. परंतु एका गोष्टीची खंत सुद्धा वाटते जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्री मंडळात एकही महीला नसणे थोडसं कमी पणाचं वाटतं. काय अडचण आहे मला कळत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 10:10 IST
ताज्या बातम्या