सातारा : प्रेमसंबंधातून तृतीयपंथीयाने लग्नाचा तगादा लावल्याने त्याचा गळा आवळून खून केला. नंतर वीजवाहक तारेने मृतदेहाच्या कंबरेस वजनदार दगड बांधून विहिरीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना म्हसवड (ता. माण) येथे घडली.मृत तृतीयपंथी राशी ऊर्फ राहुल अजिनाय घुटुकडे (वय २५) याच्या खुनाचा तपास सहा तासांत लावण्यात म्हसवड पोलिसांना यश आले. याप्रकरणी समाधान विलास चव्हाण (रा. दिवड, ता. माण) यास पोलिसांनी अटक केली.

मसाईवाडी (म्हसवड) गावच्या हद्दीतील एका विहिरीत अनोळखी मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसल्याचे म्हसवड पोलीस ठाण्यात कळवले गेले.मृतदेहाची ओळख पटविणे आव्हानात्मक असताना पोलिसांनी हातावर गोंदलेल्या नावाचे आधारे मृताच्या नातेवाइकांचा शोध घेतला. ही माहिती समाजमाध्यमावर प्रसारित केली. त्या वेळी मृताच्या नातेवाइकांचा संपर्क झाला. त्या वेळी मृत व्यक्ती मोटेवाडी (ता. माण) येथील तृतीयपंथी राशी ऊर्फ राहुल असल्याचे निष्पन्न झाले.

Sharad Pawar
Sharad Pawar : “मी तुम्हाला शब्द देतो, एकदा राज्य हातामध्ये द्या, मग…”, शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Uddhav Thackeray VS CJI DY Chandrachud
Uddhav Thackeray : “अन्यथा सरन्यायाधीशांनी गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली असती”, ‘त्या’ भेटीवरून उद्धव ठाकरेंचा चिमटा
Uddhav Thackeray On Mahayuti
Uddhav Thackeray : “गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार”, उद्धव ठाकरे यांचा महायुतीला इशारा
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “लाडक्या बहिणींना १५०० रुपये देतात, पण त्यांच्या…”, शरद पवारांची महायुतीवर जोरदार टीका
udhhav thackeray
Uddhav Thackeray : “मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न तेव्हाही नव्हतं, आताही..”; उद्धव ठाकरे स्पर्धेतून बाहेर?
Delhi Crime Case Doctor Murder
Delhi Doctor Murder Case : विवाहबाह्य संबंध, लग्नाचं आमिष अन् हत्या; दिल्लीतील हत्याप्रकरणी डॉक्टर, नर्स आणि अल्पवयीन मुलामधील संबंधांचा उलगडा!

हेही वाचा >>>उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता देऊ! आर्थिक कोंडीशी झुंजणाऱ्या एसटीकडून कर्मचाऱ्यांना आवाहन

पुढील तपासात मृताचे आणि संशयित समाधान विलास चव्हाण यांचे प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून समाधान चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली. आपले व राशी ऊर्फ राहुलचे प्रेमसंबंध होते. माझ्याशी लग्न कर आणि मला घरी घेऊन चल, असा तगादा लावला होता, म्हणून मी त्यास ठार मारून मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याचे सांगितले. त्यावरून समाधान चव्हाण यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत.