scorecardresearch

धक्कादायक : जन्मदात्या आईनेच केला पाच महिन्याच्या चिमुकल्याचा खून

मुलाला ठार मारून पुरल्याची पोलिसांना स्वत:च फोन करून दिली माहिती

(प्रातिनिधिक छायाचित्र)

तरडगाव (ता. फलटण) येथे जन्मदात्या आईनेच पाच महिन्याच्या चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

पांढरी, तरडगाव येथील आरती गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस ठाण्यात फोन करुन “ मी माझ्या पाच महिन्याच्या लहान बाळाला १२ एप्रिल रोजी दुपारी ठार मारुन पुरलेले आहे. तुम्ही लगेच गाडी पाठवा, नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचातरी खून करीन असे सांगितले.” त्यावरून पोलिसांनी तिच्याकडे जावून खात्री केली असता तिने तिचा लहान मुलगा कार्तिक याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून उशीने नाक तोंड दाबून ठार मारल्याचे सांगितले.

याची माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी व सहकाऱ्यांसमवेत त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन माहीती घेतली व सदर महिलेस ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी लोणंद पोलीसात फिर्याद दिली असुन महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे.

आरती गायकवाडला या आरोपी महिलेला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता, चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The mother killed her five month old baby msr