scorecardresearch

Ganesh Chaturthi 2023: घरगुती गणेशांच्या आगमनात पावसाची हजेरी

उद्यापासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू असून गणेशमूर्ती विक्रीसाठी सांगलीतील जिल्हा बँकेसमोर स्टॉल लावण्यात आले आहेत.

ganesh idol agman
घरगुती गणेशाबरोबर पावसाची हजेरी

सांगली : पावसाच्या हलक्या सरीबरोबरच सोमवारी घरगुती गणेशाचे मोरयाच्या गजरात आगमन झाले. उद्यापासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू असून गणेशमूर्ती विक्रीसाठी सांगलीतील जिल्हा बँकेसमोर स्टॉल लावण्यात आले आहेत. उद्यापासून गणेशोत्सवाला सुरूवात होत असतानाच यंदाच्या उत्सवावर दुष्काळाचे तीव्र सावट दिसत आहे. तथापि, प्रदीर्घ काळच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून हलयया पावसाची रिपरिप सुरू झाल्याने गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

आज घरगुती गणेशाचे स्वागत करण्यात आले, तर उद्यासाठी श्रींची मूर्ती निश्‍चित करण्यासाठी बालगोपालासह गणेश भक्तांची जिल्हा बँकेजवळील स्टॉलवर गर्दी झाली होती. सुमारे ४० स्टॉल याठिकाणी उभारण्यात आले असून मूर्तीकारांनी वेगवेगळ्या रूपातील श्रींच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. उद्यापासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवासाठी पूजेला लागणारे दुर्वा, आघाडा, पानसुपारी, फुले, नारळ या साहित्यासह सजावटीचे साहित्य खरेदीसाठी हरभट रोड, मारूती मंदिर चौक, मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसर आदी ठिकाणी नागरिकांची आज गर्दी झाली होती. यातच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने विके्रत्यांचीही साहित्य आच्छादन करण्यासाठी घाईही उडाली होती.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
jansatta-bhupesh-baghel-interview
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची द इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईन मीडिया समिटच्या रायपूरमधील ‘मंथन’ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती!
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The presence of rain in the arrival of household ganesha ganeshostav ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×