scorecardresearch

आंदोलन करताच कोल्हापुरी गुळाचा दर वधारला

कोल्हापूरच्या गुळाला देशाबरोबरच विदेशातही प्रंचड मागणी असते. मात्र, गेल्या आठवड्यात गुळाला कमी दर दिल्यामुळे गुळ उत्पादकांनी बाजारपेठ बंद पाडली होती.

आंदोलन करताच कोल्हापुरी गुळाचा दर वधारला
आंदोलन करताच कोल्हापुरी गुळाचा दर वधारला

गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडल्यानंतर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुळाचे दर वाढले आहेत. प्रति क्विंटल सरासरी ५०० रुपये दरात वाढ झाली आहे.

हेही वाचा- कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यातील एसटी सेवा विस्कळीत; प्रवाशांची गैरसोय

कोल्हापूरच्या गुळाला देश-विदेशात मागणी असते. यावर्षी गुळ हंगाम सुरू झाला तेव्हा प्रतिक्विंटल ५१०० रुपये असणारा दर गेल्या आठवड्यात ३२०० रुपये इतका कमी झाला होता. त्यावर गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी गुळ उत्पादन खर्चाचा विचार करून प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर मिळावा अशी मागणी करून बाजार समितीतील गुळ सौदे बंद पाडणारे आंदोलन केले होते. गेले तीन दिवस गुळ बाजारपेठ ठप्प झाली होती.

हेही वाचा- तलवारीने केक कापला; राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची ठाकरे गटाची मागणी

दरम्यान, गुळ उत्पादकांची मागणी लक्षात घेऊन गुळ खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रतवारीनुसार गुळाला ३३०० ते ४२०० रुपये असा दर मिळत आहे. सरासरी पाचशे रुपये दर वाढ झाली असल्याने विक्रीसाठी गुळ आणल्याने आज बाजार समितीतील वर्दळ वाढली होती. कोल्हापुरातून गुळाची मागणीही वाढत चालली आहे . कोल्हापूर बाजार समितीमध्ये शनिवारी ३० किलोचे १३,९७२ रव्यांची आवक झाली. तर ४८ हजार ८६७ रव्यांची विक्री झाली. १३१७ रवे शिल्लक राहिले, असे बजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 19:20 IST

संबंधित बातम्या