विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्या बोलताना शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे दिसून आले. काही लोक केवळ भगवा मिरवताय पण पाठीमागे कोणाकोणासोबत जाताय हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली आहे. असं फडणवीस यांनी बोलून दाखलं.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपल्या सगळंयाचा उत्साह बघता माझ्या मनात कुठलीही शंक नाही, की पुन्हा एकदा नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकेल. जाणीवपूर्वक भाजपाचा भगवा म्हणतोय, भगवा तर छत्रपतींचा आहे. परंतु तो छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली आहे. काही लोक केवळ भगवा मिरवताय, पण पाठीमागे कोणाकोणासोबत जाताय हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे भगव्याचं रक्षण करायची आणि भगवा फडकतच राहिला पाहिजे, या महाराष्ट्रात ही जबाबदारी भाजपाने घेतली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या भरवशावर घेतली आहे.”

minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
cm eknath shinde hatkanangale lok sabha marathi news
हातकणंगलेच्या उमेदवारीवरून शिंदेसेनेतील मतभेद चव्हाट्यावर; उमेदवारीत बदल नाही, माने यांचा विश्वास
Mahavikas Aghadi candidate of Chandrapur Vani Arni Lok Sabha Constituency MLA Pratibha Dhanorkar has filed his second nomination form Chandrapur
“मी रडणार नाही, तर लढणार,” प्रतिभा धानोरकर यांचे शक्तिप्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

तसेच, “खरं म्हणजे नाशिक महापालिकेच्या मागील निवडणुकीत जनतेने एक मोठा आशीर्वाद भाजपाला दिला. त्यावेळी मी सांगितलं होतं की, आपण आशीर्वाद द्या नाशिक शहर मी दत्तक घेईन. काही लोकाचा गैरसमज असा झाला की दत्तकचा अर्थ रोज महापालिका चालवायची आणि त्यातून दलाली खायची. कारण पूर्वी अनेक लोक असं करायचे. आमच्याकडे दत्तकचा अर्थ तो नाही. आमच्याकडे दत्तकचा अर्थ एवढाच आहे, महानगर पालिका महापालिकेचे पदाधिकारी चालवतील जिथे अडचण येईल तिथे आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू. जेवढ्या देशातील आणि राज्यातील योजना आहेत, त्या सगळ्या योजना नाशिकमध्ये आम्ही आणून दाखवू. ” असंही फडणीस यावेळी म्हणाले.