Premium

तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; दोघांना अटक

पोलिसांनी तातडीने हालचाल करत जावई सुरेश विलास निकम व त्याचा साथीदार रोशन कैलास निकम (दोघे रा. संगमनेर) या दोघांना नाशिकमधून आज सकाळी अटक केली.

son-in-law killed wife, brother-in-law grandmother-in-law Savlivihir shirdi
तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; दोघे अटक (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राहाता: जावयाने सासरच्या सहा जणांवर चाकूहल्ला करत पत्नी, मेहुणा व आजेसासू अशा तिघांचा खून केला. सासू-सासरे व मेहुणी असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांवर शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिर्डीजवळील सावळीविहीर गावात आज, गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने हालचाल करत जावई सुरेश विलास निकम व त्याचा साथीदार रोशन कैलास निकम (दोघे रा. संगमनेर) या दोघांना नाशिकमधून आज सकाळी अटक केली. या तिहेरी हत्याकांडाने शिर्डीचा परिसर हादरून गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेत पत्नी वर्षा (२४), मेहुणा रोहित गायकवाड (२५) व आजेसासू हिराबाई गायकवाड (७०) यांचा जागीच मृत्यू झाला तर सासरा चांगदेव गायकवाड, सासू संगीता गायकवाड व मेहुणी योगिता जाधव हे तिघे गंभीर जखमी झाले.

हेही वाचा… “महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, विजय वडेट्टीवारांची माहिती

शिर्डीजवळील सावळीविहीर गावात गायकवाड कुटुंब राहते. गायकवाड यांचा जावई सुरेश निकम व त्याचा नातेवाईक रोशन निकम हे दोघेजण रात्री दहाच्या सुमारास सासुरवाडीला आले. घराचा दरवाजा उघडताच दोघांनी हातातील चाकूने सासरच्या लोकांवर हल्ला केला. त्यानंतर दोघेही मोटरसायकलवरून नाशिकच्या दिशेने पसार झाले. नगर पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या दोघांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर नाशिक-पुणे रस्त्यावरील शिंदे गावाजवळ असलेल्या पथकर नाक्याजवळ सापळा रुचून दोघांना पकडण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The son in law killed wife brother in law and grandmother in law in savlivihir shirdi dvr

First published on: 21-09-2023 at 13:32 IST
Next Story
“महाराष्ट्रात सात महिन्यांत १,५५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या”, विजय वडेट्टीवारांची माहिती