scorecardresearch

‘एल्गार’च्या सर्व आरोपींवर विशेष न्यायालय २७ एप्रिल रोजी आरोप निश्चित करणार!

आरोपी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेस पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले

(संग्रहीत छायाचित्र)

एल्गार परिषद प्रकरणाची सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालायने आज (मंगळवार) या प्रकरणाती आरोपी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेस पुढील सुनावणीसाठी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. आता याप्रकरणी २७ एप्रिल रोजी सुनावणी होण्याची शक्यता असून, यावेळी आरोप निश्चिती होईल.

या प्रकरणात पुणे पोलिसांनी २०१८ मध्ये नऊ आरोपींना, तर २०२० मध्ये एनआयएने इतर सात आरोपींना अटक केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एनआयए कडून करण्यात आलेल्या आरोपांच्या आधारावर आरोप निश्चित केले जातील.

विशेष न्यायाधीश दिनेश ई कोठालीकर यांनी आरोपींचे वकील आणि एनआयएचे विशेष सरकारी वकील यांना सांगितले की, दोन्ही पक्षांनी सहकार्य केल्यास पुढील सुनावणीत आरोप निश्चित करून खटला पुढे चालू शकतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The special court will decide the charges against all elgar accused on april 27 msr

ताज्या बातम्या