scorecardresearch

भरधाव कारने डहाणू नगर परिषदेचे दोन कर्मचारी उडवले

कारचा चालक अल्पवयीन व एक धनिकाचा मुलगा असल्याची माहिती समोर

Dhanau accident death employee

डहाणू- बोर्डी मार्गावर भरधाव कारने डहाणू नगर परिषदेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली. एका अल्पवयीन मुलाच्या बेदरकारपणे कार चालविण्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला.

भरत राऊत (५५) व वकेश झोप (३७) अशी अपघातात मृत पावलेल्या डहाणू नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची नावं आहेत. धडक दिलेल्या कारचा चालक अल्पवयीन व एक धनिकाचा मुलगा असल्याचे सांगण्यात येते. या अपघातात भरधाव कारवरील ताबा सुटून ती थेट भिंतीवर धडकली.

याप्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेने डहाणू शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The speeding car hit two employees of dahanu municipal council msr

ताज्या बातम्या