रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये नवीन चार शासकीय गोदामे बांधकामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी एकूण ११ कोटी ५२ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. खेड,  मंडणगड, लांजा आणि गुहागर अशा तालुक्यात ही शासकीय गोदामे बांधण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील खेड, मंडणगड, लांजा तसेच गुहागर या तालुक्यांतील निवडक गावांमध्ये प्रत्येकी एक अशा चार नवीन शासकीय गोदामांसाठी  प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या  पाठपुराव्यामुळे मिळाली असल्याचे सांगितले जात आहे. मान्यता मिळालेल्या या शासकीय गोदामांमध्ये अन्नधान्य, औषध साठा, आपत्ती व्यवस्थापन साहित्य आणि ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक साधनसामग्रीचे योग्य साठवण होऊ शकणार आहे.

या चारही गोदामांचा थेट लाभ  तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. ११ कोटी ५२ लाख खर्चून बांधण्यात येणा-या या गोदामांची एकूण क्षमता ३१०० चौ.मी. इतकी असून कामाचा दर्जा राखून आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बाबत  राज्यमंत्री  योगेश कदम यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या निधीतून ग्रामीण भागाला आवश्यक  सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही गोदामे फक्त इमारती नसून गावकऱ्यांच्या सेवेसाठी उभारली जाणारे विश्वासाचे केंद्र असणार आहेत.