वादळात जाहिरात व्यवसायाला तडाखा

तौक्ते वादळाचा फटका वसईतील जाहिरात व्यावसायिकांनासुद्धा सहन करावा लागला आहे.

जाहिरात फलक कोसळले, कर माफ करण्याची मागणी

विरार: तौक्ते वादळाचा फटका वसईतील जाहिरात व्यावसायिकांनासुद्धा सहन करावा लागला आहे. मागील दोन दिवसाच्या सोसाटय़ाचे वाऱ्याने जाहिरातदारांचे मोठे नुकसान केले आहे. वादळीवाऱ्यामुळे अनेक जाहिरातदारांचे छोटे मोठे फलक तुटून पडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मागील दोन अडीच वर्षांपासून तालुक्यातील जाहिरात व्यवसाय अडचणीत होता, त्यात मागील वर्षी करोना महामारीमुळे टाळेबंदी जाहीर झाली, त्यामुळे सर्व व्यवसाय बंद पडले. त्यात महापालिकेने जानेवारी महिन्यात फलकांवर कारवाई करून फलक उद्ध्वस्त करून पाडले, मागील दोन वर्षांंपासून जाहिरात धोरण न ठरल्याने प्रशासनाने धोरण ठरवून जाहिरात कर बारा पटीने वाढवला जो संपूर्ण देशात ‘क’ वर्गाच्या महापालिकांना नाही. पूर्वी वर्षांला भरावा लागणारा कर आता महिन्याला भरावा लागत आहे.

दरम्यान, आपला व्यवसाय टिकवा यासाठी जाहिरात व्यावसायिकांनी कर्ज काढून व्यवसायिकांनी नवीन परवानग्या घेत पुन्हा फलक दामदुप्पट खर्च करून उभे केले. पुन्हा राज्य शासनाने टाळेबंदी घोषित केली. यामुळे जाहिरात व्यावसायिका पुन्हा अडचणीत आले. अनेक कामे रद्द झाली आणि जी कामे केली त्याचे पैसे बुडाले. त्यात आता तौक्ते चक्रीवादळाची भर पडली. वादळामुळे शहरातील अनेक जाहिरात फलक उन्मळून पडले. त्यात पुन्हा पालिका कर भरण्यासाठी तगादा लावत आहे. त्यामुळे पालिकेने पुढील काळातील जाहिरात कर रद्द करावा अशी मागणी वसई तालुका जाहिरात व्यावसायिक संघटनेने शासनाकडे केली आहे. शहरातील जाहिरात व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले असून पालिकेने सहानभूतीपूर्वक विचार करावा, असे सुगो जाहिरात कंपनीचे सुभाष गोंधळे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The storm hit the advertising business ssh

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या