ब्रिटिशांनी वार्षिक 10 पौंडांवर ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं दिलेली मुंबई ते भारताची आर्थिक राजधानी झालेली मुंबई, अवघ्या दोन-चार चौरस किलोमीटरच्या परीघात सामावलेली मुंबई ते सुमारे सहाशे चौरस किलोमीटर विस्तारलेली मुंबई, शेकड्यामध्ये मोजता येईल एवढीच लोकसंख्या असलेली मुंबई ते सुमारे दोन कोटी माणसांना कवेत घेणारी मुंबई, कोळी भंडारी समाजाचं मूळ वसतीस्थान असलेली मुंबई ते अठरापगड जातीच्या, अनेकविध भाषांच्या नागरिकांना व सर्व धर्मीयांना आपलंसं केलेली कॉस्मॉपॉलिटन मुंबई… विविध रोगांनी त्रस्त असल्यामुळे विदेशी नागरिकांसाठी नरक झालेली मुंबई ते जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलेली मुंबई…

1661 मध्ये पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई आंदण दिली त्यानंतर एक दुर्लक्षित बंदर ते भारतीय उद्योगजगताचा व अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू झाला, भारताची आर्थिक राजधानी मुंबई. कोट्यवधी भारतीयांसाठी स्वप्ननगरी झालेल्या या मुंबईची गोष्ट लवकरच घेऊन येत आहोत लोकसत्ता डॉट कॉमच्या वाचकांसाठी…