सावंतवाडी : युनेस्कोचे पथक दि. ६ व ७ ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पक्ष, संघटना, अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामस्थ, एन.एस.एस, एन.सी.सी, विविध सामाजिक मंडळे, सामाजिक संस्था व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत राज्यातील मराठा लष्करी स्थापत्य यांना युनेस्को जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी नामांकन प्रस्ताव सादर केलेला आहे. जागतिक वारसा म्हणून किल्ले विजयदुर्ग व किल्ले सिंधुदुर्ग यांचे संवर्धन व संगोपण करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक दि.६ ऑक्टोबर रोजी विजयदुर्ग तर ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे.

Navi Mumbai Semiconductor project
‘सचिन तेंडुलकर ‘पिच’वरून ‘चीप’वर आले’, एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Raj Thackeray On One Nation One Election
Raj Thackeray : ‘एक देश एक निवडणुकी’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणुकांचं महत्व एवढंच वाटतंय तर…”
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?

हेही वाचा – Aaditya Thackeray : “कुठे गेलं तुमचं हिंदुत्व?”, भारत-बांगलादेश सामन्यावरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

हेही वाचा – Raj Thackeray : ‘एक देश एक निवडणुकी’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “निवडणुकांचं महत्व एवढंच वाटतंय तर…”

दुर्ग वैभव हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांप्रती नागरिकांचे भावनिक नाते आहे. आपल्या जिल्ह्यातील दोन किल्ल्यांची दखल जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे. त्यामुळे किल्ल्याची देखभाल करणे, त्याचे जतन व संवर्धन करणे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’ (SBC) म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ (SHS) २०२४ मोहीम दि. १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा २०२४ साठी ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ ही थीम निश्चित केलेली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, पक्ष, संघटना, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विजयदुर्ग व सिंधुदुर्ग या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.