घरातील हातभट्टीचा अड्डा उध्वस्त, दोघांना अटक

एकजण अद्याप फरार, पनवेल पोलिसांची आठवडाभरात दुसरी कारवाई

पनवेल पोलिसांनी एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा हातभट्टी बनवणारा अड्डा उध्वस्त केला असून यात दोघांना अटक केली तर एक जण फरार आहे. टाळेबंदीत वाईन शॉप आणि बीअर बार बंद असल्याने बेकायदा गावठी दारूची मागणी वाढली आहे. त्यातून हे प्रकार घडत आहेत. अनंत बाळकृष्ण सुरते (वय-५७), डांसर छोटू राठोड(वय-३८) असे अटक आरोपींची नावे असून दोन्ही राहणार पेठगाव, तालुका पनवेल येथील आहेत. अद्याप एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे, यात अन्य दुकानांसह बीअर बार आणि वाईन शॉप बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे साहजिक ज्यांना रोजच मद्य प्राशन करण्याची सवय आहे त्यांची पंचाईत झाली त्यामुळे चोरी छुपे मद्य विक्री करणाऱ्यांची चांदी झालीच शिवाय बऱ्यापैकी पायबंद बसलेली गावठी दारू बनवली जाऊ लागली.

गावठी दारू ही एखाद्या निर्जन ठिकाणी भट्टी म्हणजे मोठी चूल लावून बनवली जाते म्हणून तिला हातभट्टी असेही म्हटले जाते. अशाच पद्ध्तीने दारू बनवणारा अड्डा नुकताच पनवेल पोलिसांनी उध्वस्त केला होता. या प्रकरणामुळे पोलिसांची नजर पनवेलच्या आसपास निर्जन ठिकाणावर गेली त्यामुळे हातभट्टी बनवणाऱ्यावर चाप बसला मात्र त्यातून मार्ग काढत काही महाभागांनी घरीच गॅसवर हातभट्टी बनवणे सुरू केले होते. या बाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सुमारास पोलीस उपनिरीक्षक अजय बाबर व पथकाने पेठगाव, पनवेल येथील चाळीमध्ये जाऊन छापा मारला असता तेथे तीन व्यक्ती दोन खोल्यांमध्ये गॅसच्या शेगडीवर गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना आढळून आले.

पोलिसांची चाहूल लागताच एक जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला तर इतर दोघांना अटक करण्यात पोलिसांना  यश आले आहे. दोन्ही खोल्यात मिळून एकूण ३०० लिटर दारू काढण्याचे रसायन, ७ लिटर तयार हातभट्टीची दारू, दोन गॅस सिलेंडर, दोन शेगड्या, २ चाटू अशा १७ हजार ३०० च्या मिळून आलेल्या मुद्देमालाचे नमुने घेऊन इतर मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

आरोपींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम कोव्हिड-१९ उपाय योजना नियम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक केले असून सध्या जामिनावर मुक्त केले आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The village liquor spot was demolished both were arrested msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या