धुळ्यातील निवृत्त नायब तहसिलदारांच्या घरात चोरी

४८ हजाराचा ऐवज केला लंपास

Theft,Tahsildars house, dhule,marathi news, marathi
प्रातिनिधीक छायाचित्र

धुळे येथील दोंडाईचा शहरात चोरट्यांनी निवृत्त नायब तहसिलदारांच्या बंद घरात चोरी केल्याची घटना घडली. यात चोरट्यांनी ४८ हजाराचा ऐवज लंपास केला. याबाबत सुरेश श्रीधर पवार (वय ७२) यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धुळ्यातील दोंडाईचा येथील शाळा क्र. ९ जवळ राहणारे निवृत्त नायब तहसिलदार सुरेश पवार हे आपल्या कुंटूबियांसोबत २७ जुलै रोजी बाहेर गावी गेले होते. मंगळवारी ते घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. ते ज्यावेळी घरी परतले तेव्हा घराचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. त्यांनी याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ३२ इंची एलसीडी टिव्ही, चांदीचे देव आणि रोख ३ हजार व दान पेटी असा एकूण ४७ हजार ८०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Theft in retired nb tahsildars house in dhule