राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांना केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी आज २४ जानेवारी रोजी बोलावले होते. यावरून राष्ट्रवादीने राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन केले. या आंदोलनात सुप्रिया सुळे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तसंच, सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. यावरून अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.

“आज रोहित पवारांच्या ईडी चौकशीविरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मला हा प्रश्न पडतो की, जेव्हा आदरणीय अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकशा सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाही? तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे वाटले नाही का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
Jitendra Awhad allegation
अजित पवारांच्या आदेशाने कळव्यातील मैदानाला टाळे लागल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “नको ती दादागिरी…”
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया

हेही वाचा >> रोहित पवार ईडीसमोर हजर; सुप्रिया सुळे म्हणतात, “केंद्राच्या अधिकृत माहितीनुसार…”

“केवळ अजितदादाच नाहीत तर जयंत पाटील,अनिल देशमुख,छगन भुजबळ ,नवाब मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या वेळेसदेखील कधीही मोर्चे काढले नाहीत. पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा, असे तुम्हाला वाटले नाही का? अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्याची १०० खोटी कारणे तुम्ही देत असाल, परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब म्हणून मानत नाही हे देखील तितकेच विदारक सत्य आहे”, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांनी केली.

हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा- सुप्रिया सुळे

सध्याचा काळ शरद पवार गटासाठी आणि एकूणच विरोधकांसाठी संघर्षाचा असल्याची भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली आहे. “सत्याचा विजय होईलच. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आव्हानं येत राहतील. आम्ही आव्हानांवर मात करून संघर्ष करू. पण सत्याच्याच मार्गाने चालू हा यशवंतराव चव्हाणांचा वारसा पुढे नेण्याचं काम शरद पवारांनी गेली ६ दशकं केलं आहे. त्याच महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमची ही लढाई आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.