वाई: जून महिना संपला तरी साताऱ्यातील धरणसाठे रीतेच आहेत. जून महिन्यात मागील वर्षीपेक्षा चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.तरीही धरणसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने शिवसागर जलाशयात पाण्याची जादा आवक झाली.  जिल्ह्यात तुलनेत महाबळेश्वर मध्ये ही कमी पाऊस झाला आहे. सध्या कोयनेचा साठा १९.०४ टीएमसी एव्हडा आहे.

सध्या साताऱ्या त दुष्काळी भाग वगळता सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला तरच धरणे भरण्याची शक्यता आहे. जून महिन्यात पाऊस राहिला असला तरी कोयना,धोम, धोम- बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी यासह मध्यम प्रकल्पात आज अखेर १६ टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. येथे मागील वर्षी जून महिना अखेर ८१९.७०. पाऊस आला होता तर यावर्षी आज अखेर ८७०.६० मिमी (३४.२७६ इंच) पाऊस झाला आहे.

हेही वाचा >>>“कपटी लोकांनी आम्हाला छळलं”, शिंदेंच्या नेत्याची भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्र्यावर टीका? महायुतीत जुंपली?

कोयना,धोम, धोम- बलकवडी, कण्हेर, उरमोडी,  व नागेवाडी मध्यम प्रकल्पात च्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस आहे. पाऊस कमी असल्याने ऑगस्ट अखेर धरणे भरण्याचे संकट आहे. जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस येणे हिताचे आहे जुलै च्या शेवटच्या पंधरवड्यात व ऑगस्टमध्ये दरवर्षी जोरदार पाऊस होऊन धरणे भरतात अशी नोंद आहे. मागील वर्षीच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणे मोकळी झाली आहेत. धरणाच्या पाण्यात गुडूप झालेल्या वाडया वस्त्या मंदिरं,पूल  साकव रस्ते पाणी अटल्याने अवशेष उघडे खुले झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत ‘झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात अत्यल्प भर पडली.  जून महिना संपल्याने धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे मत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी – व्यक्त केले. त्यामुळे धरणक्षेत्रांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.