Premium

“महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लकच राहणार नाही कारण..”, छगन भुजबळ यांचं वक्तव्य चर्चेत

जाणून घ्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी असं वक्तव्य का केलं आहेय़

Chhagan Bhujbal
नेमकं काय म्हणाले आहेत छगन भुजबळ? (फोटो – संग्रहित छायाचित्र)

आता कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही. सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसींमध्ये येत आहेत त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहेत. त्यामुळे कुठल्याही उपायांची गरज आहे असं मला वाटत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले आहेत छगन भुजबळ?

सगळेच्या सगळे मराठा जर कुणबी होणार आहेत तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा बिल आणा पण बाहेर कोण राहणार आहे? आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत. हा ओबीसींचा आयोग राहिलाच नाही हा मराठ्यांचा आयोग झाला आहे असंही छगन भुजबळ म्हणाले. मनोज जरांगे पाटील माझ्याविरोधात रोज बोलतो कारण त्याशिवाय त्याचं भाषण कुणी ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: There will be no maratha community left in maharashtra because all will become obcs said chhagan bhujbal scj

First published on: 06-12-2023 at 15:24 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा